कामठी शहरातील ट्राफिक सिग्नल-ट्राफिक बूथ अजूनपावेतो बेपत्ता

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- नागपूर जिल्ह्याचे उपनगर मानले जाणारे कामठी शहराचा नागपूर पोलीस आयुक्तालयात समावेश झाल्यानंतर पोलिसांची कार्यप्रणालीला अति वेग आला असून प्रत्येक विभागाशी संबंधित संलग्न कार्यालये करण्यात आली . स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, वाहतूक पोलीस विभागाचे पोलीस निरीक्षक, सायबर सेलचे पोलीस निरीक्षक असे वेगवेगळे विभागाचे विभाग निरीक्षक वेगळे नेमल्या गेले आहेत. तर नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्र 7 हा कामठी शहरातील लोकवस्तीतून जात असून या मार्गावरील वाढती वाहतूक वर्दळ सह वाढीव असलेले अपघाती मृत्यू लक्षात घेता माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकारातून या मार्गाचे 754 कोटीच्या निधीतून दुपदरी रस्ता बांधकाम करण्यात आले आज सात वर्षांचा काळ लोटून गेला मात्र स्थानिक नगर परिषद प्रशासन तसेच वाहतूक विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षितामुळे या मार्गावरील काढण्यात आलेले वाहतूक सिग्नल पुनःश्च लावण्यात आले नाही उलट हे ट्राफिक सिग्नल भंगारावस्थेत पडलेले आहेत.

कामठी नागपूर मार्गावर कामठीहुन नागपूरकडे जाणाऱ्या तसेच नागपूरहुन कामठीकडे येणाऱ्या नागरिकाची वाहतूक वर्दळ ही गतीने सुरू आहे. त्यातच नीयमबाह्य पद्धतीने वाहतूक करणारे , तसेच बेशिस्त वाहतुकदारांना लगाम लावण्यासाठी वाहतूक पोलीस चौका चौकात उभे राहून कर्तव्यदक्ष नोकरी बजावत असतात मात्र येथील संवेदनशील चौक असलेले एसबीआय चौक, कामठी कळमना वळण मार्ग हाकी बिल्डिंग चौक, जयस्तंभ चौक, मोटर स्टँड चौक, ड्रॅगन पॅलेस भुयार पुलिया चौक, कमसरी बाजार पुलिया चौक तसेच साई मंदिर चौक पर्यंत अजुनपावेतो एकही वाहतूक सिग्नल लावण्यात आले नाही तसेच ट्राफिक बूथ सुद्धा लावण्यात आले नाही ही एक शोकांतिकाच माणावी लागेल. त्यामुळे वाहतूकदार नाईलाजाने त्रस्त होत असल्याची स्थिती निर्माण झाली असून आज सात वर्षांचा काळ लोटून गेला तरी बहुतांश चौकात झेब्रा क्रॉसिंग लावण्यात आले नाही, ट्राफिक सिंगनल लावण्यात आले नाहो, ट्राफिक बूथ सुद्धा लावण्यात आले नाही तेव्हा बेशिस्त वाहतूक दारांना पडून जेव्हा कुण्या निर्दोष वाहतुकदाराचा बळी ची झडी लागेल तेव्हा या वाहतूक व नगर परिषद प्रशासनाला जाग येईल का? असा प्रश्न येथील जागरूक नागरिक करीत आहेत.

कामठी बस स्टँड चौकात अवैध वाहतुकीचा विळखा – कामठी बस स्टँड चौकात खानावळी,पान ठेले, लस्सी दुकाने आहेत या दुकानासमोर दुकानदारांनी पार्किंगची व्यवस्था केली नसल्यामुळे वाहतूकदार या दुकानात येण्यासाठी बिनधास्तपणे रस्त्यावर वाहने उभी करीत असतात तर या मार्गावर अवैध वाहतुकीचा विळखा हे नित्याचेच असून तीन सीटर ऑटो पासून तर दुचाकी चालकांची मोठ्या प्रमाणात अवैध पार्किंग असते. या सर्व वास्तु स्थितीशी खुद्द स्थानिक पोलीस तसेच वाहतूक पोलीस अवगत आहेत तरीसुद्धा डोळे मिटून बसले आहेत तर याच बस स्टँड चौकात मागील पाच वर्षांपूर्वी अवैध पार्किंग वरूनच कांग्रेसचे पदाधिकारी तुषार दावाणी यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता कसाबसा तुषार दावाणी यांचा जीव बचावला तसेच एका सफाई कर्मचाऱ्यांवर सुदधा धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता तरीसुद्धा आजही परिस्थिती जैसे थे!अजूनही कायमच आहे.तेव्हा येथील वाहतूक पोलीसांनी याकडे अक्षम्य दुर्लक्ष न पुरविता कारवाही करावी व वाहतुकीची शिस्त लावावी अशी मागणी येथील जागरूक नागरिकांनी केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अनिल गलगली ने पुरस्कार राशि देवदेश प्रतिष्ठान को सौंपी

Mon Feb 6 , 2023
मुंबई :- जाने-माने आरटीआई कार्यकर्ता अनिल गलगली ने पुरस्कार के रूप में प्राप्त धन राशि देवदेश प्रतिष्ठान के सामाजिक कार्यों के लिए सौंपी है। वरिष्ठ पत्रकार अनिल गलगली एक आरटीआई कार्यकर्ता हैं। सरकारी स्रोतों से प्राप्त सटीक जानकारी और प्रामाणिक दस्तावेज़ से अनिल गलगली अक्सर मीडिया की सुर्खियाँ बटोरते हैं। उन्होंने सरकारी अधिकारियों और राजनेताओं द्वारा सत्ता के दुरुपयोग, भ्रष्टाचार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com