ईश्वर नगर चौक ते ज्योती शाळा चौक वाहतूक प्रतिबंधित

– मनपा आयुक्तांचे आदेश: २४ मे पर्यंत वाहतूक बंद 

नागपूर :- सिमेंट रोडच्या बांधकामाकरिता ईश्वर नगर चौक ते ज्योती शाळा चौक (शिव मंदिर पर्यंत) पर्यंत वाहतूक प्रतिबंधित करण्याचे आदेश नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी दिले आहेत.

नागपूर महानगरपालिकेद्वारे सिमेंट कॉक्रीट रोड नागपूर शहर टप्पा १ अंतर्गत (उर्वरीत काम) ईश्वर नगर चौक ते ज्योती शाळा चौक (शिव मंदिर पर्यंत) दोन्ही बाजू दरम्यान रस्ता सिमेंट काँक्रीटचा करण्याचे येणार असून, या कामाकरिता या रस्त्यावरील वाहतूक प्रतिबंधित करणे आवश्यक असल्यामुळे येत्या २४ मे पर्यंत दोन्ही बाजू दरम्यान रस्ता कोणत्याही वाहतूकीस बंद करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहे.

सदर मार्गावरील वाहतूक डावी बाजू वाहतुकीस बंद केल्यानंतर रस्त्यावरील वाहतूक रस्त्याच्या उजव्या बाजुस वळवण्यात येत आहे. तसेच डाव्या बाजूस काम पूर्ण करुन उजव्या बाजूस वाहतूकीस बंद केल्यानंतर रस्त्यावरील वाहतूक रस्त्याच्या डाव्या बाजूस वळवण्यात येणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 99 प्रकरणांची नोंद, उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

Fri Apr 28 , 2023
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. गुरुवारी (27) रोजी शोध पथकाने 99 प्रकरणांची नोंद करून 63700 रुपयाचा दंड वसूल केला.शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!