मनपा आयुक्तांचे आदेश : १० मार्च २०२३ पर्यंत दोन्ही बाजूची वाहतूक बंद
नागपूर :- सिमेंट रोड बांधकामाकरिता वर्धा रोड हॉटेल रेडिसन ब्ल्यू ते जयताळा रोड, यशोदा पब्लिक स्कूल ते जयताळा बाजार चौकापर्यंत वाहतूक प्रतिबंधित करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले आहेत. त्या अनुषंगाने १० मार्च २०२३ पर्यंत उपरोक्त मार्गावरून कोणत्याही वाहतुकीस दोन्ही बाजुकडील मार्ग बंद करण्यात येणार आहे. नमूद रस्त्यावरील वाहतूक हिंगणा कडून येणारी व हिंगणाकडे जाणारी वाहतूक टी पॉईंट ते मंगलमूर्ती चौक या मार्गांनी वळविण्याचे मनपा आयुक्तांनी आदेशात नमूद केले आहे.
मनपा आयुक्तांद्वारे जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार काम सुरू असलेल्या ठिकाणी सदर रस्त्यादरम्यान दोन्ही बाजूस सूचना फलक ठळक अशा ठिकाणी नागरिकांच्या सुचनेकरिता लावणे, सदर रस्ता वाहतूक बंद करण्यासाठी किंवा नियंत्रित करण्यासाठी कांबी किंवा खांब व इतर संपर्क साधने वापरून रस्त्यावरील वाहतूक बंद करणे, आवश्यक वळण मार्ग दर्शविणारे फलक योग्य त्या ठिकाणी उभारणे, या रस्त्यावरील दुतर्फा रहिवासी असलेल्या नागरिकांच्या सोयीकरिता अशी व्यवहार्य सुविधा उपलब्ध करणे तसेच विहित कालमर्यादेत काम पूर्ण करून रस्ता वाहतूकीस खुला होईल यादृष्टीने कार्यवाही करण्याचेही आयुक्तांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
कामाच्या ठिकाणी सुचना फलक व काम सुरु केल्याची/काम पूर्ण करण्याची दिनांक असलेला बोर्ड लावावा. पर्यायी मार्ग सुरु होतो त्या ठिकाणी दोन्ही टोकावर तसेच बॅरीकेटस जवळ रोडवर आपले वाहतुक सुरक्षा रक्षक/स्वयंसेवक नेमावे. वाहतूक सुरक्षारक्षक, वाहतूक चिन्हांच्या पाट्या, कोनस्, बॅरिकेट्स दोरी रिफ्लेक्टिव्ह जॅकेट, एल.ए.डी. बॅटन, ब्लेकर्स, इत्यदी संसाधने उपलब्ध करावे, काम सुरु झाल्यानंतर निघणारा कच्चा माल उदा. माती, गिट्टी, पिवर ब्लॉक, वगैरे मूळ घसरण निर्माण होउन वाहतुकीस अडथळा निर्माण होईल असे रस्त्यावर टाकू नये. त्याकरिता विशेष व्यवस्था करण्यात यावी. काम झाल्यानंतर सदरहू बांधकाम दरम्यान पर्यायी मार्गावरील रस्त्यावर झालेले खड्डे बुजवून त्यावर सिमेंटीकरण /डांबरीकरण करून रोड पूर्ववत करावा. पर्यायी मार्ग सुरु होतो त्या ठिकाणी व काम करणार आहे त्या मार्गाचे बाजुला लोकांना दिसेल अशा ठिकाणी पर्यायी मार्गाबाबत वळण मार्ग सविस्तर माहिती असणारे फलक लावण्यात यावेत.
रात्रीचे वेळी वाहनचालकांना माहितीकरीता एलईडी डाव्हर्सन बोर्ड लावणे आवश्यक आहे. बॅरिकेटींगवर एलएडी माळा लावणे आवश्यक आहे. उजव्या बाजूचे दुतर्फा व वाहतूक चालणार आहे त्या ठिकाणी अस्थाई रस्ते दुभाजक तयार करुन एकाच मार्गावरुन दुतर्फा वाहतूक वळविण्यात यावी. अनुचित प्रकार घडल्यास कंत्राटदार स्वतः जबाबदार राहतील. वाहतुक नियमांचे तसेच वाहतुक पोलिसांनी दिलेल्या दिशानिर्देशाचे पालन करावे. या रस्त्यावरील दुतर्फा रहिवासी किंवा कार्यालय असलेल्या नागरीकांचे सोयीकरिता आवश्यक अशी व्यवहार्य उपलब्ध करुन घ्यावी. असेही आयुक्तांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.