हसनबाग चौक ते गजानन नगर पर्यत वाहतूक प्रतिबंधित

नागपूर :- नागपूर महानगरपालिकाद्वारे रोड क्रमांक २६ हसनबाग चौक ते गाडगे नगर रमना मारोती ते गजानन नगर पर्यंत सिमेंट कॉंक्रिट रस्त्याचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित केले आहे. या कामाकरिता हसनबाग चौक ते गाडगे नगर रमना मारोती ते गजानन नगर पर्यंत रस्त्यावरील वाहतूक प्रतिबंधित करण्याचे आदेश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत. हे आदेश येत्या १८ ऑक्टोबर २०२४ पर्यंत अमलात राहतील.

हसनबाग चौक ते गाडगे नगर रमना मारोती ते गजानन नगर पर्यंत पर्यंतच्या रस्त्यावरील वाहतूक उजव्या बाजूने बंद करून ती डाव्या बाजूस वळविण्यात येणार असल्याचे आदेश आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहे.

याशिवाय काम सुरू असलेल्या ठिकाणी मनपा आयुक्तांद्वारे जारी करण्यात आलेल्या आदेशात कामाचे ठिकाण सुचना फलक व काम सुरू केल्याची काम पूर्ण करण्याची दिनांक नमूद करावे. तसेच कंत्राटदाराने स्वतःचा पत्ता व संपर्कासाठी मोबाईल क्रमांक असलेला बोर्ड लाखावा, पर्यायी ‘मार्ग सुरू होतो. त्याठिकाणी दोन्ही टोकावर तसेच बॅरीकेटस जवळ रोडवर आपले वाहतुक सुरक्षा रक्षक / स्वयंसेवक नेमावे वाहतुक सुरक्षा रक्षक, वाहतूक चिन्हाच्या पाट्या, कोनस्, बॅरिकेट्स दारी रिफ्लेक्टिव्ह जॅकेटर्स एज.ई.डी. बॅटन, ब्लिकर्स, इत्यादी संसाधने उपलब्ध करावे, काम सुरु झाल्यानंतर जमिनीतुन निघणारे मटेरियल उदा. माती, गि‌ट्टी, पेव्हर ब्लॉक, वगैरे मुळे घसरण निर्माण होवून वाहतुकीस अथळा निर्माण होईल असे रस्त्यावर टाकू नये, त्याकरिता विशेष व्यवस्था करण्यात यावी, असे नमूद करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आदिवासी हिंदू आहेत की नाहीत ? 

Thu Aug 1 , 2024
या देशातील कोट्यवधी आदिवासी अलीकडे अस्तित्वाच्या तिढ्यात अडकलेत ! हा घोर तिढा म्हणजे आदिवासी हिंदू आहेत की नाहीत ? खरेतर, संविधानाने आदिवासींना कोणत्याच धर्माचे मानलेले नाही. आदिवासींची म्हणजे अनुसूचित जनजातीची म्हणजे शेड्युल्ड ट्राईब्सची वर्गवारी मान्य करतांना संविधानाने त्यांची जगण्याची स्थिती व सांस्कृतिक आधार ही मानदंडे व मापदंडे स्वीकारली. शेड्युल्ड कास्ट व ओबीसी यांची वर्गवारी मान्य करतांना सामाजिक विषमता व धार्मिक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com