राजेंन्द्र नगर चौकातील वाहतूक एकतर्फा बंद 

मनपा आयुक्तांचे आदेश : १६ जानेवारी २०२३ पर्यंत दोन्ही बाजूची वाहतूक बंद

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेव्दारे साऊथ सिवरेज प्रकल्प झोन क्र. ५ मधील प्रभाग क्र. २७ राजेंन्द्र नगर चौक ते नंदनवन झोपडपट्टी नागनदी पर्यंत मुख्य गडर लाईन करण्याचे काम प्रस्तावित केले आहे. सदर कामाकरीता या रस्त्यावरील वाहतूक प्रतिबंधित करणे आवश्यक असून राजेंन्द्र नगर चौकातील वाहतुकीसाठी एकतर्फा रस्ता बंद करण्याचे आदेश मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी दिले आहेत.

नमूद रस्त्यावरील वाहतूक डाव्या बाजुने दुतर्फा जाईल / इतर वाहतूक अंतर्गत रस्त्यावरून वळविण्यात येत आहे. सदर आदेश २ जानेवारी २०२३ पासून १६ जानेवारी २०२३ पर्यंत अमलांत राहील, असे आदेशात नमूद केले आहे.

काम सुरू असलेल्या ठिकाणी मनपा आयुक्तांद्वारे जारी करण्यात आलेले आदेशात या रस्त्यादरम्यान दोन्ही बाजूस ठळक अशा ठिकाणी नागरिकांच्या सुचनेकरिता फलक लावणे, सदर रस्ता वाहतूक बंद करण्यासाठी किंवा नियंत्रित करण्यासाठी कांबी किंवा खांब व इतर संपर्क साधने वापरून रस्त्यावरील वाहतूक बंद करणे, आवश्यक वळण मार्ग दर्शविणारे फलक योग्य त्या ठिकाणी उभारणे, या रस्त्यावरील दुतर्फा रहिवासी असलेल्या नागरिकांच्या सोयीकरिता अशी व्यवहार्य सुविधा उपलब्ध करणे तसेच विहित कालमर्यादेत काम पूर्ण करून रस्ता वाहतूकीस खुला होईल यादृष्टीने कार्यवाही करण्याचेही आयुक्तांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

तसेच कामाच्या ठिकाणी सुचना फलक व काम सुरु केल्याची / काम पूर्ण करण्याची दिनांक असलेला बोर्ड लावावा. पर्यायी मार्ग सुरु होतो त्या ठिकाणी दोन्ही टोकावर तसेच बॅरीकेटस जवळ रोडवर आपले वाहतुक सुरक्षा रक्षक / स्वयंसेवक नेमावे. वाहतूक सुरक्षारक्षक, वाहतुक चिन्हांच्या पाटया, कोनस, बॅरिकेट्स दोरी रिफ्लेक्टिव्ह जॅकेट, एल.ए.डी. बॅटन, ब्लेकर्स, इत्यदी संसाधने उपलब्ध करावे, काम सुरु झाल्यानंतर निघणारा कच्चा माल उदा. माती, गिट्टी, पिवर ब्लॉक, वगैरे मुळ घसरण निर्माण होवून वाहतुकीस अडथळा निर्माण होईल असे रस्त्यावर टाकू नये. त्याकरिता विशेष व्यवस्था करण्यात यावी. काम झाल्यानंतर सदर्हु बांधकाम दरम्यान पर्यायी मार्गावरील रस्त्यावर झालेले खड्डे बुजवुन त्यावर सिमेंटीकरण /डांबरीकरण करून रोड पुर्ववत करावा. पर्यायी मार्ग सुरु होतो त्याठीकाणी व काम करणार आहे त्या मार्गाचे बाजुला लोकांना दिसेल अशा ठिकाणी पर्यायी मार्गाबाबत वळण मार्ग सविस्तर माहिती असणारे फलक लावण्यात यावेत.

आदेशात नमूद केले आहे की, रात्रीचे वेळी वाहनचालकांना माहितीकरीता एलईडी डाव्हर्सन बोर्ड लावणे आवश्यक आहे. बॅरीगेटींगवर एलएडी माळा लावणे आवश्यक आहे. उजव्या बाजुचे दुतर्फा व हतुक चालणार आहे त्या ठिकाणी अस्थाई रस्ते दुभाजक तयार करुन एकाच मार्गावरुन दुतर्फा वाहतुक वळविण्यात यावी. अनुचित प्रकार घडल्यास कंत्राटदार स्वतः जबाबदार राहतील. वाहतुक नियमांचे तसेच वाहतुक पोलीसंनी दिलेल्या दिशा निर्देशाचे पालन करावे. या रस्त्यावरील दुतर्फा रहिवासी किंवा कार्यालय असलेल्या नागरीकांचे सोयीकरिता आवश्यक अशी व्यवहार्य उपलब्ध करुन घ्यावी. असे आयुक्तांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

2841 athletes have been selected as Khelo India Athletes across the country in 21 sports discipline under Khelo India Scheme: Anurag Singh Thakur

Fri Dec 23 , 2022
NEW DELHI :- Key Highlights: Khelo India Athletes are selected on their performance in the Khelo India Games, National Championships / open selection trials SAI provides a platform for identification of talented sports persons in priority Sports disciplines through the National Sports Talent Search Portal This was stated by  Anurag Singh Thakur in a written reply in Rajya Sabha today […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!