पेचनदी तुन अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर ट्राली जप्त

६ लाख ५५ हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त.

पारशिवनी :- पारशिवनी तहसीलच्या पेच धरणाजवळ  नदी तिल गावातून रोडवर अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पारशिवनी पोलिसांनी उपनिरिक्षक पळनाते व स्टाफसह गस्त पैट्रोलिग करित असताना जप्त केला.

आज सायकाळच्या सुमारास पारशिवनी तालुकाच्या पेचधरणा  जवळील नदी पात्रातुन अवैध वाळू वाहतूक करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच पो. उपनिरिक्षक ज्ञानबा पळनाते यांच्या सह पोलिस स्टाफ यांनी नाकाबंदीचे नियोजन केले. असुन शुक्रवार . ७/10/22 रोजी सायकाळी ४.३० वा पो. उप.नी. पळनाते सोबत स्टाफ यांचे सोबत गस्त पेट्रोलिंग व चेकींग ड्युटी करिता असतांना गुप्त बातमी द्वारा  माहीती मीळाली की एक ट्रॅक्टर ट्रॉली पेच धरणा जवळ पेचनदी च्या पात्रातुन व रोडकडुन पारशिवनीकडे रेती घेउन जात आहे अशा विश्वसनीय खबरेवरुन आम्ही दोन पंचाना बोलवुन रेड करणे असल्याची माहीती देउन आम्ही स्टॉफ व पंच पेच धरणा जवळ शिवारात थांबले असता तिथे रोड वर एक ट्रक्टर मुंडा क्रमाक एम एच३६ झेड६३४० व ट्रॉली क्र एम एच३६ झेट२०८२ येतांनी दिसला त्याला थांबविले असता त्या ट्रक्टर चालक शालिक भाऊराव तिळगाम वय ४० राहणार परसोडी पाराशिव नी असे सांगीतले सदर ट्रक्टर ची पाहणी केली असता ट्रक्टर ट्रॉली मध्ये रेती अवैद्य रित्या बिना परवाना मिळुन आली ब्रास रेती कि . ५००० रु व ट्रक्टर किमत ५.००.००० रुपये व ट्रॉली कि ०१.५०.०००रु असा एकुण ०६,५५,००० रु . चा माल मिळुन आल्याने पंचासमक्ष घटनास्थळावर जप्त करण्यात आला तसेच आरोपी चालक शालिक भाऊराव तिळगाम याच विरुद्ध पारशिवनी पोलिसानी कलम 379 अन्वये गुन्हा नोद करून पुढील कार्यवाही पो. नि. राहुल सोनवने यांचे मार्गदर्शनात पो.उप.नि. ज्ञानवा पळनाते पुढील तपास करित आहे.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

केलीबाग सड़क का चौड़ीकरण कार्य धीमी गति से 

Tue Oct 11 , 2022
– स्थानीय दुकानदार नहीं दे तहे साथ,मनपा अतिक्रमण विभाग की ली जा रही सहायता  नागपुर :- केंद्रीय मंत्री नितिन गडकरी के महल स्थित बंगले के सामने से गुजरने वाले केलीबाग रोड के विस्तार स्थानीय दुकानदारों की वजह से थम गया हैं, इसलिए अब मनपा अतिक्रमण विभाग का सहारा लिया जा रहा हैं. केलीबाग मार्ग के विस्तार में आने वाली बाधाओं […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com