नागपूर:- बारावी बोर्डाच्या मार्च 2023 च्या परीक्षेमध्ये अमर सेवा मंडळ, नागपूर द्वारा संचालित सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय, बुटीबोरी, नागपूर येथील विज्ञान शाखेची सलोनी देवेंद्र धार्मिक ही 83.50% घेवून ही बुटीबोरी विभागातून टॉपर आली आहे. अमर सेवा मंडळाचे सचिव तथा पदवीधर मतदारसंघ नागपूर विभागाचे आमदार अँड. अभिजित गो. वंजारी यांच्या शुभहस्ते सलोणी धार्मिकचा पुष्पगुच्छ प्रदान करून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य नितीन मधुकर डोये, प्रा.चेतन नहाते आणि कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. या महाविद्यालयाचा विज्ञान व वाणिज्य शाखेचा निकाल 100 टक्के लागला असून विज्ञान शाखेतून जान्हवी वानखडे हिला 78%, ओंकार सिंह ह्याला 77.33%, प्रबोध कांबळे ह्याला 77.17%, वंश महेश गवळी ह्याला 77% गुण प्राप्त केले आहे. अमर सेवा मंडळाच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी वंजारी, संस्थेचे सचिव तथा नागपूर पदवीधर मतदार संघाचे आमदार अँड. अभिजीत वंजारी, संस्थेच्या कोषाध्यक्षा डॉ.स्मिता वंजारी, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य नितीन मधुकर डोये, प्रा.चेतन नहाते आणि कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षकांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्याचे व पालकांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्याबद्दल शुभेच्छा दिल्यात.
सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालयातील सलोनी धार्मिक बुटोबोरी विभागातून टॉपर हिचा आमदार अँड. अभिजित वंजारी यांच्या शुभहस्ते सत्कार
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com