यवतमाळ :- एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडाच्यवतीने आदिवासी लाभार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. या योजनेसाठी लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्याद्वारे लाभार्थी निवड प्रक्रिया दि.६ मार्च रोजी दुपारी २ वाजता प्रकल्प कार्यालयात ठेवण्यात आली आहे.
न्युक्लिअस बजेट योजनेंतर्गत विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. त्यामध्ये ८५ टक्के अनुदानावर सर्वसाधारण आदिवासी शेतकऱ्यांना बी-बीयाणे, खते व किटकनाशके यासाठी अर्थसहाय्य, शंभरटक्के अनुदानावर आदिम (कोलाम) जमातीच्या शेतकऱ्यांना बी-बीयाणे, खते व किटकनाशके यासाठी अर्थसहाय्य, शंभरटक्के अनुदानावर आदिम (कोलाम) जमातीच्या शेतकऱ्यांना वन्यजीवापासून शेताचे संरक्षण करण्यासाठी तार कुंपनासाठी अर्थसहाय्य, ८५ टक्के अनुदानावर सर्वसाधारण आदिवासी लाभार्थ्यांना विविध व्यवसाय करण्यासाठी अर्थसहाय्य, शंभरटक्के अनुदानावर आदिम (कोलाम) जमातीच्या लाभार्थ्यांना विविध व्यवसाय करण्यासाठी अर्थसहाय्य तसेच ८५ टक्के अनुदानावर सर्वसाधारण आदिवासी लाभार्थ्यांना शेळीगटासाठी अर्थसहाय्य करणे या योजनांचा समावेश आहे.
या लाभासाठी लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया दि.६ मार्च रोजी दुपारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडा येथे दुपारी २ वाजता ठेवण्यात आली आहे. योजनेच्या लाभार्थ्यानी प्रकल्प कार्यालयात निवड प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे प्रकल्प अधिकारी सुहास गाडे यांनी केले आहे.