संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- तीन टप्प्यात होणाऱ्या नियोजीत ग्रा प उपसरपंच निवडणूक कार्यक्रमानुसार 6 जानेवारीला 9 ग्रा प उपसरपंच निवडणूक पार पडली तर आज 9 जानेवारीला दुसऱ्या टप्प्यात 9 ग्रा प च्या उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली असून उद्या 10 जानेवारीला उर्वरित 9 ग्रा प उपसरपंच पदाची निवडणूक पार पडणार आहे.
आज 9 ग्रा प च्या उपसरपंच पदाची पार पडलेल्या निवडणुकीत आजनी ग्रा प च्या उपसरपंच पदाची निवडणूक ही पीठासीन अधिकारी नवनिर्वाचित सरपंच संजय जीवतोडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली असून या निवडणुकीत आजणी ग्रा प च्या उपसरपंच पदी हेमराज दवंडे यांच्या उमेदवारी अर्ज विरोधात कुणाचाही उमेदवारी अर्ज नसल्याने उपसरपंच पदी हेमराज दवंडे बिनविरोध निवडून आले.तर भोवरी ग्रा प च्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत पीठासीन अधिकारी नवनिर्वाचित सरपंच ऋषी भेंडे यांना निर्णायक मत देण्याची जवाबदारी प्राप्त झाली ज्यामध्ये पहिल्या फेरीत सरपंच ऋषी भेंडे ने दिलेल्या मतदानात उमेदवार देविदास नागतोडे व ओमहरी कोंगे यांना प्रत्येकी चार असे समसमान मते पडले दरम्यान सरपंचाने निर्णायक मत दिल्यावरून उपसरपंच पदी देविदास नागतोडे 5 मते घेऊन विजयी झाले.
कढोली ग्रा प उपसरपंचपदी महेश कुपाले, लिहिगाव ग्रा प उपसरपंच पदी शांताराम ठाकरे,कापसी बु उपसरपंच पदी शिला ठाकरे,गुमथळा ग्रा प उपसरपंच पदी महेश काकडे,गादा ग्रा प उपसरपंच पदी मोहन बंडूजी मारबते ,आवंढी ग्रा प उपसरपंच पदी सुरेखा सोनटक्के तर सोनेगाव ग्रा प उपसरपंच पदी नीलकंठ भगत निवडून आले.
-उद्या 10 जानेवारीला तरोडी बु, परसाड, जाखेगाव, केम,दिघोरी, आडका,शिवणी, भुगाव, वडोदा ग्रा प उपसरपंच पदाची निवडणूक होणार आहे