भंडारा :- आरोग्य प्रबोधिनी, शिक्षण विभाग, सलाम मुंबई फाऊंडेशन द्वारा उपयोजित तंबाखू मुक्त शाळा अभियान महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य, शिक्षण व समाज कल्याण विभागाद्वारे राबविण्यात येत आहे. तंबाखू मुक्त शाळांच्या अंमलबजावणीसंदर्भात आयोजित गटशिक्षणाधिकारी, विस्ताराधिकारी, गटसमन्वयक केंद्रप्रमुख व तंत्रस्नेही शिक्षक यांच्या एकत्रित सभेचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे विशेष अतिथी मार्गदर्शक आरोग्य प्रबोधिनी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश गभने हे होते. शासन परिपत्रका नुसार तंबाखूमुक्त शाळांची नऊ निकष कसे पूर्ण करावेत व त्याची कार्यवाही काय असावी, एकूण कृती कार्यक्रम यासोबतच विद्यार्थी शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समितीचा सहभाग, तंबाखूमुळे होणारे शारीरिक व इतर सामाजिक दुष्परिणाम, आर्थिक हेळसांड याबाबतीतही चर्चा करण्यात आली. खरेच या सेवनामुळे अगदी कमी वयात मुख कर्करोग पूर्व लक्षणे यांचे वाढते प्रमाण यावरही चिंता व्यक्त करण्यात आली. तंत्रस्नेही शिक्षणाच्या माध्यमातून सलाम मुंबई फाउंडेशनच्या टोबॅक्को फ्री स्कूल अॅप वर करावयाची एन्ट्री या संबंधित मार्गदर्शन आरती पुराम यांनी केले.
काय आहेत तंबाखू मुक्त शाळेचे निकष?
1 शैक्षणिक संस्थेच्या आवारात तंबाखू मुक्त क्षेत्रचा फलक लावलेला असावा
2 शाळेच्या प्रवेशद्वारावर तंबाखू मुक्त शाळा असा फलक असावा
3 शाळेच्या आवारात तंबाखूजन्य पदार्थ सेवन केल्याबाबतचा पुरावा नसावा
4 तंबाखू दुष्परिणाम बाबतचे पोस्टर शाळेच्या आवारात लावलेली असावे.
5 शाळेत सहा महिन्यातून किमान एक तंबाखूमुक्ती बाबत जनजागृतीचा कार्यक्रम घेण्यात यावा.
6 शैक्षणिक संस्था अधिकृत व्यक्ती यांचे नाव, पद, पदनाम व संपर्क क्रमांक याचा उल्लेख फलकावर असावा.
7 शैक्षणिक संस्था व परिसरात तंबाखू तथा तंबाखू जन्य पदार्थाचा वापर करण्यास सक्त मनाई आहे असा नियम शैक्षणिक संस्थेच्या सहिते मध्ये समाविष्ट करण्यात यावा.
8 शैक्षणिक संस्थेच्या बाह्य भिंतींपासून 100 यार्ड हे क्षेत्र रेखांकित केलेले असावे
9 शैक्षणिक संस्थेच्या 100 यार्ड परिसरात तंबाखू तथा तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणारे दुकाने नसावे.
@ फाईल फोटो