लॅपटॉप खरेदीसाठी ७ लाभार्थ्यांना ३,९६,४४९ रुपयांचे अर्थसहाय्य
नागपूर : नागपूर महानगरपालिका, समाजविकास विभागातर्फे शहरातील दिव्यांग बांधवाकरिता एकूण नऊ कल्याणकारी योजना राबविण्यात येत असून या योजनेच्या ४६ पात्र लाभार्थ्यांना सोमवारी (ता.२५) प्रत्येकी ५० हजार याप्रमाणे एकूण २३ लक्ष रुपयांचे धनादेश वितरित करण्यात आले. याशिवाय लॅपटॉप खरेदीसाठी ७ लाभार्थ्यांना ३,९६,४४९ रुपयांचे धनादेशही उपायुक्त विजय हुमने यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात समाजविकास अधिकारी दिनकर उमरेडकर, विभागीय कर्मचारी बागडे, उईके, दीनदयाल अंत्योदय योजनेतील विनय त्रिकोलवार, बांते, खोब्रागडे उपस्थित होते.
समाज कल्याण विभागाच्या दिव्यांग बांधवांकरिता राबविण्यात योजनेसाठी दिव्यांगांना वैयक्तिक स्वयंरोजगाराकरिता तथा बचत गटांना स्वयंरोजगार अर्थसहाय्य योजने अंतर्गत विभागातील छाणनी समिती तथा सुकाणू समितीद्वारे एकूण ४६ लाभार्थ्यांना पात्र ठरविण्यात आले. या ४६ लाभार्थ्यांना प्रत्येकी ५०,००० हजार रुपये या प्रमाणे अनुदानाचा प्रथम टप्पा असे एकूण २३,००,००० रुपयांमधून प्रत्येकी ५०,००० हजार रुपये प्रमाणे वळते करण्यात आले.
दिव्यांगांना सहाय्यभूत साधने व तंत्रज्ञान या योजने करिता अर्थसहाय्य अंतर्गत समितीद्वारे एकूण ७ लाभार्थ्यांना पात्र ठरविण्यात आले. या योजने अंतर्गत लॅपटॉप खरेदी करणा-या दिव्यांग बांधवांच्या अनुदानाची रक्कम ६०,००० रुपयांपर्यंत मर्यादित करण्यात आलेली असून ज्या लाभार्थ्यांची मागणी त्यांच्या खरेदीच्या वस्तुप्रमाणे ६० हजार रुपयांपेक्षा कमी आहे त्यांना त्यांच्या मागणीनुसार अनुदानाची रक्कम वितरीत करण्यात येणार आहे. वरील योजनेतील ७ पात्र लाभार्थ्यांचे एकूण ३,९६,४४९ रुपये विभागाला प्राप्त झालेले असून, उपरोक्त दोन्ही धनादेश उपायुक्त विजय हुमणे यांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना वितरीत करण्यात आले.
कर्णबधिर दिव्यांगांना शस्त्रक्रियेकरिता अर्थसहाय्य योजना, दिव्यांगांना वैयक्तीक स्वयंरोजगाराकरिता, दिव्यांग बचत गटांना स्वयंरोजगाराकरिता अर्थसहाय्य योजना, मंतिमंद घटकातील दिव्यांगांना निर्वाहभत्ता योजना, दिव्यांगासाठी शिष्यवृत्ती व व्यवसाय प्रशिक्षणाकरिता अर्थसहाय्य योजना, दिव्यांगाना सहाय्यभूत साधने व तंत्रज्ञान याकरिता अर्थसहाय्य योजना, प्रधानमंत्री आवास योजना (घटक क्र.३ परवडणारी घरकुले), राज्यस्तरीय, राष्ट्रीयस्तरीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेणा-या दिव्यांगांना अर्थसहाय्य योजना, अंत्योदय योजना अंतर्गत दिव्यांग बांधवाना ई-रिक्षा करिता अर्थसहाय्य योजना, मोटोराईज्ड ट्रायसिकल वाटप योजना या ९ कल्याणकारी योजनां अंतर्गत दिव्यांग बांधवांना धनादेश वितरीत करण्यात आले.