जनतेच्या सेवेसाठी घेतलेले व्रत पूर्ण करण्याची ताकद मिळावी म्हणून साईबाबांचे आणि त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले – देशमुख

 – डॉ. आशिष र. देशमुख ‘नैवेद्यम नॉर्थस्टार’ सभागृहात येत्या रविवारी, 18 जूनला सकाळी 10.00 वाजता ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

नागपुर :- भाजप प्रवेशापूर्वी डॉ. आशिष र. देशमुख यांनी शिर्डी येथे श्री साईबाबा आणि नाशिक जिल्ह्यातील श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. तिथे उपस्थित प्रसार माध्यमांशी केलेल्या वार्तालापात ते म्हणाले, “मी राजकीय वाटचालीच्या महत्वपूर्ण वळणावर आहे. महाराष्ट्रातील जनतेची चांगली सेवा करण्याची संधी व ताकद मिळावी म्हणून साईबाबांचे आणि त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेण्यासाठी मी येथे आलो आहे. माझं राजकीय आयुष्य आता नवीन वळणावर उभं आहे. भविष्यात जनतेची सेवा करीत रहावं, हीच माझी अपेक्षा आहे. समाजाच्या सेवेचे व्रत घेऊन मी राजकारणात आलो आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी माध्यम हे महत्वाचे आहे. त्या अनुषंगानेच, एका नवीन वाटेवर माझे जाणे आता निश्चित झाले आहे. मी एक कार्यकर्ता म्हणून आणि जनतेची सेवा करण्याच्या दृष्टीने पुढची वाटचाल करणार आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबद्दल महाराष्ट्र आणि विदर्भातील कॉंग्रेस पक्षामधील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये कमालीची नाराजी आहे. अशा परिस्थितीत कॉंग्रेस पक्षाबद्दल बोलणं गरजेचे नाही. माझं राजकीय आयुष्य आता सकारात्मक वळणावर असून ते जनतेच्या सेवेसाठी रहावं, हीच माझी अपेक्षा आहे.”

डॉ. आशिष र. देशमुख भाजपमध्ये प्रवेश घेणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोराडी येथील ‘नैवेद्यम नॉर्थस्टार’ सभागृहात येत्या रविवारी, 18 जूनला सकाळी 10.00 वाजता ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

यावेळी भाजपचे विदर्भातील सर्व वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहतील. डॉ. आशिष र. देशमुख यांचे कार्यकर्तेसुद्धा यावेळी उपस्थित राहतील.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Pause on rates has given a new direction to the equity markets - Emkay Wealth Management

Sat Jun 17 , 2023
– Banks witnessing healthy margins and improving asset quality Strong support for BSE IT at 26,80, first target on the upside at 31,106 PLI scheme, extraordinary expansion of mfg exports aiding the performance of mfg cos Mumbai :- Emkay Wealth Management, the wealth management and advisory arm of Emkay Global Financial Services has released a note on equities and the […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com