तिरोडा तालुका पत्रकार संघातर्फे 15 सप्टेबरला स्पर्धा परीक्षा मागदर्शन शिबीराचे आयोजन.

अमरदिप बडगे, प्रतिनिधी 

गोंदिया :- जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील तालुका पत्रकार संघाच्यावतीने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीराचे 15सप्टेबरला सकाळी 10 वा. आयोजन करण्यात येणार आहे.

कोरोना काळामुळे दोन वर्ष स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांकरीता फार कठीण गेले असुन त्याचे मनोधैर्य वाढविण्यासाठी स्पर्धा परीक्षा तयारी सराव कशा पध्दतीने करावे,अशा अनेक बाबी लक्षात घेता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीराचे आयोजन पत्रकार संघातर्फे 15 सप्टेंबरला सी.जे.पटेल महाविद्यालय येथे सकाळी 10 वाजे दरम्यान कार्यक्रम राहणार असुन प्रमुख मार्गदर्शक म्हणून गोंदिया जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले, तिरोडा उपविभागीय अधिकारी पुजा गायकवाड, गोंदिया शिक्षणाधिकारी डॉ. महेन्द्र गजभीये, तिरोडा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे ,संबंधित स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.त्याचबरोबर नुकतेच तिरोडा तालुक्यातील महाराष्ट्र राज्य सेवा आयोग परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे स्मृती चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात येणार आहे.तरी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन तिरोडा तालुका पत्रकार संघातर्फे करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

गच्चीवरील मातीविरहित बाग नागपूर समूह व हिरवाई विदर्भाची ह्या समूहातर्फे आयोजित कंपोस्ट कार्यशाळा व प्रदर्शन.

Mon Sep 12 , 2022
नागपूर :- आज दिनांक 11 सप्टेंबर 2022 ला नक्षत्र सेलेब्रेशन हाॅल. प्रतापनगर नागपूर. येथे उल्लेखित ग्रुप द्वारा कंपोस्ट कार्यशाळा व पर्यावरण व गार्डन संबंधित प्रदर्शनीचे उद्घाटन  राम जोशी (अति. आयुक्त, म.न.पा.नागपूर) ह्यांचा हस्ते  दीपप्रज्वलनाने  झाले, त्या सोबत प्रमुख अतिथी म्हणून सी.ए. आरती कुळकर्णी व प्रशांत चौधरी, अध्यक्ष, एस.ई.रेल्वे , काॅ. हाॅ सोसा. व आमच्या जेष्ट सभासद अंजली पडळकर पण उपस्थित […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com