गुरुवारी मनपा केन्द्रांमध्ये कोव्हीशिल्ड उपलब्ध

नागपूर :  राज्य शासनाकडून कोव्हीशिल्ड लसीच्या पर्याप्त पुरवठा प्राप्त झाल्यामुळे १८ वर्षांवरील व ४५ वर्षावरील वयोगटातील सर्व नागरिकांचे लसीकरण नागपूर महानगरपालिकेसह शासकीय केन्द्रावर गुरुवारी २ डिसेंबर रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ पर्यंत होणार आहे. या वयोगटातील नागरिकांना कोव्हिशिल्ड लस नि:शुल्क दिली जाईल. मनपा तर्फे नागरिकांना मोठया प्रमाणात लसीकरण करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांना प्रथम डोज, दूसरा डोज घेण्यासाठी लस पुरेश्या प्रमाणात उपलब्ध आहे.

            लसीकरणसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने नोंदणी करता येईल,  ही माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. तसेच ‘ड्राइव्ह इन व्हॅक्सीनेशन’ केंद्रावरसुद्धा १८ वर्षावरील व ४५ वर्षावरील सर्व नागरिकांचे  कोव्हिशिल्डचे लसीकरण सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजे पर्यत होईल, ही माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.संजय चिलकर यांनी दिली.

            तसेच १८ वर्षांवरील व ४५ वर्षावरील नागरिकांसाठी कोव्हॅक्सीन पहिला व दुसरा डोज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडीकल कॉलेज), डॉ बाबासाहेब आंबेडकर रूग्णालय,कामठी रोड व स्व.प्रभाकर दटके म.न.पा.महाल रोग निदान केन्द्र, एम्स, आयसोलेशन रुग्णालय, इमामवाडा, इंदिरा गांधी रुग्णालय गांधीनगर, मनपा स्त्री रुग्णालय पाचपावली, प्रगती हाल दिघोरी येथे उपलब्ध आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

बुधवारी जिल्ह्यात शून्य कोरोना पॉझिटिव्ह

Thu Dec 2 , 2021
रुग्ण डिस्चार्ज00 एकूण डिस्चार्ज58972 एकूण पॉझिटिव्ह60106 क्रियाशील रुग्ण01 आज मृत्यूशून्य एकूण मृत्यू1133 रिकव्हरी रेट98.11 टक्के मृत्यू दर01.89 आजच्या टेस्ट415 एकूण टेस्ट475843 भंडारा : जिल्ह्यात बुधवारी शून्य कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून आज (दि.1) बरे झालेल्या रुग्णांची संख्या 00 आहे. बुधवारी 415 व्यक्तींची चाचणी केली असता एकही व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आला नाही. त्यामुळे जिल्ह्यात आता एक सक्रिय रुग्ण आहे. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 58972 आहे तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 60106 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के आहे. आतापर्यंत 04 लाख 75 हजार 843 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यात 60106 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!