संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी तालुक्यातील खैरी गावात चरायला गेलेल्या चार म्हशीपैकी तीन म्हशींचा जिवंत विद्दूत ताराच्या स्पर्शाने तीन म्हशींचा जागीच मृत्यु झाला तर एक म्हैस जख्मि झाल्याची घटना आज सकाळी 11 दरम्यान खैरी गावात घडली.
प्राप्त माहितीनुसार खैरी गावातील शेतकरी दिगंबर देवराव ठाकरे यांच्या चार म्हशी आज सकाळी 10 वाजता गावात चरायला गेल्या असता येथील विद्दूत विभागाच्या दुर्लक्षितांमुळे पडलेल्या जिवंत तारांचा चरत असलेल्या म्हशीला स्पर्श झाल्याने तीन म्हशी जागीच मरण पावल्या तर एक म्हैस जख्मि झाली.घटनेची माहिती मिळताच ग्रा प सरपंच योगीता धांडे, माजी सरपंच किशोर धांडे यांनी त्वरित घटनास्थळ गाठून झालेल्या घटनेची निंदनीय चिंता व्यक्त करीत नुकसानग्रस्त शेतकरी दिगंबर ठाकरे चे सांत्वन केले.तसेच विद्दूत विभागाच्या निष्काळजीपणा मुळे मुख्य दूध व्यवसाय असणाऱ्या तिन्ही म्हशी मरण पावल्याने नुकसांनग्रस्त शेतकरी दिगंबर ठाकरे यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.तेव्हा या घटनेला जवाबदार असलेल्या एम एस ई बी विभागाने नुकसानग्रस्त शेतकरी दिगंबर ठाकरे यांना त्वरित चार लक्ष रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थासह सरपंच योगिता धांडे ,माजी सरपंच किशोर धांडे यांनी केले आहे.मागणी पूर्ण न झाल्यास एमएसईबी प्रशासनाच्या विरोधात आंदोलन पुकारण्यात येणार असल्याचा ईशारा ग्रामस्थासह सरपंच योगिता धांडे तसेच माजी सरपंच किशोर धांडे यांनी दिला आहे.