लव्ह जिहाद’ व ‘धर्मांतर’ विरोधी कायद्यासाठी हजारोंच्या उपस्थित हिंदु जनसंघर्ष मोर्चा!

लव्ह जिहाद विरोधी कायदा करणार; धर्मांतर समस्येविषयी सरकार गंभीर : मुख्यमंत्री

– भगवेमय झाले नागपूर

– महिला-युवतींचा विशेष सहभाग

नागपूर :- लव्ह जिहादच्या विरोधात महाराष्ट्र शासन निश्चिपणे कायदा करणार आहे, तसेच धर्मांतर समस्येविषयी शासन गंभीर आहे, असे स्पष्ट आश्वासन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी ‘हिंदु जनसंघर्ष मोर्च्या’च्या शिष्टमंडळाला विधानभवनात दिले. या शिष्टमंडळात बाळासाहेबांची शिवसेनेचे मुख्य प्रतोद आणि आमदार भरतशेठ गोगावले, आमदार महेंद्र दळवी, भाजपचे माजी मंत्री डॉ. परिणय फुके, शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ, अखिल भारतवर्षीय माहेश्वरी महासभाचे श्यामसुंदर सोनी, ब्राह्मण संघटनेचे आनंद घारे, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक सुनील घनवट तथा समितीचे विदर्भ समन्वयक श्रीकांत पिसोळकर उपस्थित होते. या आंदोलनाची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांना बोलावून घेऊन त्यांचे म्हणणे विस्तृतपणे समजून घेतले. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रकाशित ‘लव्ह जिहाद’ हा ग्रंथ मुख्यमंत्र्यांना भेट देण्यात आला, तसेच ‘लव्ह जिहाद’ची भीषणता सांगण्यात आली.

आंदोलनाच्या ठिकाणी भाजपचे चाळीसगाव येथील आमदार मंगेश चव्हाण, बाळासाहेबांची शिवसेनेचे आमदार सर्वश्री महेंद्र थोरवे, भरतशेठ गोगावले, महेंद्र दळवी, भाजपचे माजी मंत्री डॉ. परिणय फुके, विश्व महावीर ट्रस्टचे संस्थापक जैनमुनी नीलेशचंद्र महाराज, सनातन संस्थेचे संत पूजनीय अशोक पात्रीकर, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस, तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. या वेळी अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

हिंदू युवती श्रद्धा वालकरचे आफताबने 35 तुकडे केल्याचे प्रकरण शांत होत नाही, तोच झारखंड राज्यातील एका हिंदू तरुणीचे दिलदार अन्सारीने 50 तुकडे केल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे; तसेच छळ, बळ, कपट करून चालेल्या धर्मांतरामुळे देशातील 28 पैकी 9 राज्यांत हिंदू अल्पसंख्यांक झाले आहेत. भारतात आणखी तुकडे होऊ नयेत, यासाठी हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी नागपूर विधान भवनावर काढलेल्या ‘हिंदु जनसंघर्ष मोर्च्या’द्वारे महाराष्ट्र सरकारकडे कठोर अशा ‘लव्ह जिहाद’ आणि ‘धर्मांतर’ विरोधी कायद्यांची मागणी करण्यात आली. या मोर्च्यामध्ये महिला अन् युवतींचा मोठा सहभाग होता. या मोर्च्यासाठी विदर्भासह महाराष्ट्रातून हजारोंच्या संख्येने आलेल्या हिंदूंनी हातात भगवे झेंडे घेऊन ‘हर हर महादेव’, ‘जय श्रीराम’चा उद्घोष करत संपूर्ण नागपूर आज भगवेमय केले होते.

या मोर्च्यात संत, महंत, धर्माचार्य, वारकरी संप्रदाय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, पूज्य शदानी दरबार, राष्ट्रीय युवा गठबंधन, राजपूत करणी सेना, विश्व सनातन संघ, नाथुराम हिंदु महासभा, अखिल विश्व सरयूपारिण ब्राह्मण महासंघ, वैश्य एकता परिषद, राष्ट्रीय वारकरी परिषद, राष्ट्रसेविका समिती, वनवासी कल्याण आश्रम, पुरोहित महासंघ, धर्मवीर आध्यात्मिक आघाडी, जैन संघटना, स्वामी समर्थ संप्रदाय, श्री संप्रदाय, इस्कॉन, गायत्री परिवार, हिंदु विधीज्ञ परिषद, रणरागिणी, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती या संघटनांसह भाजप, बाळासाहेबांची शिवसेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अन् अन्य पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्च्यात महिला पथक, भगवा ध्वजपथक, अधिवक्ते, कीर्तनकार, उद्योजक आदी शिस्तबंध पद्धतीने सहभागी झाले होते. यशवंत स्टेडियम येथून निघालेला मोर्चा महाराष्ट्र बँक, झाशी राणी चौक, व्हरायटी चौक, फ्रीडम पार्क मार्गे नागपूर विधान भवनाजवळ विसर्जित झाला.

हातात घेतलेल्या फलकांद्वारे ‘हिंदु युवतींनो लव्ह जिहादच्या षड्यंत्राला बळी पडू नका’, ‘आफताबला फाशी द्या’, ‘धर्मांतर हे राष्ट्रांतर’, ‘धर्मांतर हिंदूंना पुन्हा स्वधर्मात आणा’, ‘आंतरधर्मीय विवाह नोंदणी न्यायालयात करून ते लव्ह जिहाद आहे का? ते तपासा’, ‘लव्ह जिहादची विषवल्ली ठेचा’, ‘लव्ह जिहादसाठी होणारा अर्थपुरवठा व त्याद्वारे होणार्‍या आतंकवादी कारवायांची चौकशी करा’, ‘लव्ह जिहाद व धर्मांतर रोखण्यासाठी पोलिसांची विशेष शाखा स्थापन करा’ आदी विविध मागण्या करण्यात आल्या. या विषयी घोषणाही देण्यात आल्या.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Probationers of Indian Forest Service Call on the President

Thu Dec 22 , 2022
Nature has Given us Bountiful Presents and it is the Duty of Each One of us to be Sensitive and Responsible Towards the Environment: President Murmu NEW DELHI :-Probationers of Indian Forest Service called on the President of India, Droupadi Murmu at Rashtrapati Bhavan today (December 21, 2022). Addressing the officers, the President said that forests are the anchors for all […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com