संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 18:-संपूर्ण जगाला शांती व अहिंसेचा मार्ग दाखविणारे महाकारुणिक तथागत गौतम बुध्द यांच्या 2585 व्या जंयती निमित्त कामठी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दुकानंदार संघाच्या वतीने आयोजित भव्य भोजनदानाचा हजारोच्या संख्येतील नागरिकांनी आस्वाद घेतला.
या भव्य भोजनदान वितरण कार्यक्रमाची सुरुवात तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीला माजी नगरसेविका वैशाली मांनवटकर व जनसेवक प्रशांत उर्फ बॉबी मांनवटकर यांच्या हस्ते माल्यार्पण व दीपप्रज्वलन करीत विशेष बुद्ध वंदना घेऊन करण्यात आली.याप्रसंगी माजी नगराध्यक्ष प्रमोद उर्फ गुड्डू मांनवटकर , विनोद यादव , राजू चहांदे,वसंता सातपुते यासह दुकानदार संघ उपस्थित होते.
या भोजनदानाचा हजारोच्या संख्येतील नागरिकांनी आस्वाद घेतला असून या भोजनदान कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्य सहयोगी, राजेंद्र पाटील,शुध्दोन पाटील,मोहन सातपुते,अन्ना सांगोडकर,वसंत सातपुते ,राजु चहांदे,अविनाश वानखेडे,ईश्वर ढेंगे,शुभम बोरकर,अश्विन बोरकर,दिनेश कांबळे.सुशांत कश्यप विनोद यादव,विनोद नायर,अश्विन सातपुते, अमित ,सुमित,पियुश चकोले,राजेश,अक्षय,प्रविण वाघमारे,दुर्गासिग कुके,सतोष खुर्ग,चरण उजेनवार,गणपत,अतुल फुले,महेश महिले आदींनी मोलाची भूमिका साकारली.
हजारोच्या संख्येतील नागरिकांनी घेतला भव्य भोजनदानाचा आस्वाद
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com