हेच ते जगन्नाथाचे मंदिर, राष्ट्रपतीने भेट नाकारली

नागपूर :- महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू या दोन दिवसाच्या नागपूर भेटीत कुकडे लेआउट येथील जगन्नाथाच्या मंदिराला भेट देणार होत्या. ते मंदिर ओरिया समाजाच्या विद्यार्थी वस्तीगृहासाठी देण्यात आलेल्या नासूप्र च्या जागेवर बांधण्यात आलेले आहे.

तीन महिन्यापूर्वी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते या मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. आज या मंदिरातील आरती मध्ये राष्ट्रपती महोदया सहभागी होणार होत्या. परंतु हे मंदिर अनधिकृत असल्याने त्यांचा हा आरती दौरा रद्द करण्यात आला.

हे मंदिर अजनी पोलीस स्टेशन ते रामेश्वरी मार्गावरील कुकडे लेआउट येथे आहे. हे मंदिर दोन आदिवासी विद्यार्थी वस्तीगृहांच्या मध्ये आहे. या मंदिरासाठी या परिसरातल्या अनेक झाडांची छटाई करण्यात आली होती. या मार्गावरील फुटपाथवर असलेल्या अनेक दुकानांना कालपासून बंद ठेवण्यात आले होते. या मंदिरावर मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला होता. हा खर्च मंदिर प्रशासनाने केला की शासकीय स्तरावर केला हे कोडेच आहे?

रुग्णालय पळवण्याचे सरकारी षडयंत्र 

उत्तर नागपुरातील इंदोरा येथे असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व संशोधन केंद्र सुरू असताना, जागा असताना, मंजुरी असताना, पैसे असताना, मिहान मध्ये एम्स असताना, विनाकारण मिहान मध्ये नेण्याचे भाजप-सेना-राकाँ सरकारने षडयंत्र रचले आहे. या षडयंत्र विरोधात हॉस्पिटल बचावसाठी व भव्य विस्तारित बांधकामासाठी मागील पाच दिवसापासून नागपुरात सर्वपक्षीय जन आंदोलन सुरू आहे. याकडे राष्ट्रपती महोदया यांनी लक्ष द्यावे असे आवाहन बसपा नेते उत्तम शेवडे यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पुरोगामी प्रबोधन चळवळीची सभा संपन्न

Sat Dec 2 , 2023
नागपूर :- अनेक वर्षापासून देशातील मानवी मूल्यांचा नाश ब्राह्मणी व्यवस्थेकडुन सतत होत आहे त्यामुळेच बहुजनांची संस्कृति सुद्धा नष्ट होत आहे, जाती जाती , धर्मा धर्मा मधे एक अघोषित संघर्ष सुरु होऊन मानवतेचा विचार सुद्धा लोप पावत आहे.देशाच्या कनकोप रयातुन येत असलेल्या बातम्या याचे द्योतक आहे.तरी सुद्धा आपले सगळे सहित्तीक , कवि , लेखक आपल्या लिखानातून अशा प्रवृत्ति विरुद्ध आवाज सुद्ध बुलंद […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com