संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– हा अस्मर्णिय सोहळा स्पिंग वेली केळवद येथे साजरा झाला.
कन्हान :- विकास हायस्कुल येथिल वर्ग १० वी च्या वर्ग मित्रानी सदोतीस वर्षानी एकत्र येत कन्हान येथुन बस ने स्पिंग वेली केळवद येथे पुर्ण दिवस मनसोक्त आंनद लुटत अस्मर्णिय सहल साजरी केली.
कन्हान येथील विकास हायस्कुल मध्ये शिक्षण घेत सन १९८६-८७ च्या इयत्ता १० वी पर्यंत चे शिक्षण पुर्ण करणा-या वर्ग मित्रानी ३७ वर्षानी एकत्र येत रविवार ला सकाळी ७.३० वाजता कन्हान येथुन बस ने सहल काढुन केळवद जवळील स्पिंग वेली ला पोहचुन दिवसभर एकत्र सहवासात नास्ता, चाय घेऊन तेथिल कृत्रिम तलावात आंघोळ करित आंनद लुटला. दुपारचे जेवणाचा आस्वाद घेऊन वर्ग मित्रानी जुन्या आठवणीला उजाळा देत परिसरात भ्रमण करित बंदुक व धनुष्य बाणाने निशाने बाजी, रोप वे, सायकलिंग, घोड स्वारी, बैलबंडीवर फेरफटका मारून ३ वाजता भजे, चाय पिऊन मधुर गित, गाणी गाऊन स्वत:चे आणि तेथे उपस्थितांचे सुध्दा मनोरंजन केल्याने टाळयाचा वर्षाव झाला.
एकाएक वरूण राजानेही आपली हजेरी लावुन परिसर मनमोहक झाल्याने वर्ग मित्रानी पाऊसा चा सुध्दा मनसोक्त आंनद लुटला. स्प्रिंग वेली येथिल एंकर कामेश हयानी सुध्दा महिला पुरूषाच्या आवाजा त मधुर गाणे गाऊन चांगलीच साथ दिली आणि येथे येणारी आपली वर्ग मित्राची सहल ही सर्वगुण संपन्नते ने मनसोक्त आंनद लुटणारी अस्मरणिय सहल माझ्या मनात घर करून गेली असल्याचे संबोधित करून सर्व वर्ग मित्राना गौरवन्वित केले. सायंकाळी ७.३० वाजता परत कन्हान ला येऊन सर्व आपआपल्या गावाला रवाना होत वर्ग मित्राचा भेटीगाठीचा सोहळा आंनदात साजरा केला.
या सहलित मोहन यादव, निळकंठ मस्के, मोतीराम रहाटे, दिलीप टिकले, नीतिन वानखेडे, सचिन अल्लेडवार, मनोज बागडे, सुरेश वंजारी, संजय चोकसे, प्रमोद बावनकुळे, चंद्रशेखर घोटेकर, रंगराव पोटभरे, विजय कोलते, मनोज ढोबळे, बाळकृष्ण देशमुख, अनिल डोंगरे, संभा मस्के, राधेश्याम ठाकरे, रामेश्वर सवाईतुल, गजानन उके, धनराज तरार, योगराज रंगारी आदीनी सक्रिय सहभाग घेतला होता.