संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- नागपूर जिल्ह्याचे उपनगर मानले जाणाऱ्या कामठी शहरातील कामठी बस स्थानकात मागील काही दिवसापासून चोरट्या महिलांची टोळी सक्रिय झाली असून एस टी बस प्रवासात महिलांना मिळालेल्या 50 टक्के तिकीट सवलती मुळे महिला प्रवासांची संख्या वाढीवर असल्याने बस प्रवासी ने भरगच्च असतात याचाच फायदा घेत चोरट्या महिलांची टोळी प्रवासी असल्याचा देखावा करून बस स्थानक परिसरातून बस मध्ये चढता वा उतरता संधीचे सोने करीत हात चलाखीने चोऱ्या करीत आहेत .ह्या घटना नित्याचेच झाले असून या प्रकारामुळे कामठी बस स्थानक परिसरात महिला प्रवासी सुरक्षा ही धोक्यात आली आहे.
7 सप्टेंबर 1975 रोजी राज्य परिवहन मंडळाचे तत्कालीन सदस्य श्यामराव बाळबुधे यांच्या हस्ते कामठी बस स्थानकाचे उद्घाटन झाले होते.कामठी शहरात तहसील कार्यालय,पंचायत समिती,नगरपरिषद,दिवाणी फौजदारी न्यायालय,शासकीय उपजिल्हा रुग्णालय ,शाळा ,महाविद्यालये आदी महत्वपूर्ण कार्यालये असल्याने तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण भागातील बहुतांश नागरिक बस ने ये जा करीत असतात .या बस स्थानकातून जवळपास दररोज 25 बसेस सुटत असून काही शालेय फेऱ्याही होतात. तर 17 मार्च 2023 पासून शासनाने महिलांना एस टी बस प्रवासात 50 टक्के तिकीट सवलत दिल्याने बस प्रवासात महिलांची संख्या वाढीवर असून बसेस अश्या भरगच्च जात आहेत.
मात्र काही चोरटे संधी साधून पॉकेट मारीला गती दिली आहे तर काही चोरट्या महिला सुदधा सक्रिय होउन दररोज चोऱ्या करीत असल्याने महिला प्रवासींना नाकी नऊ आले असुन आनंदाच्या गजरात आलेल्या महिला प्रवासीना चोरीला बळी पडल्याने अश्रू पूर्ण वातावरणात प्रवास करावा लागत आहे. तेव्हा अश्या परिस्थितीत महिला प्रवासी सुरक्षा ऐरणीवर असल्याने महिला प्रवासी सुरक्षात्मक दृष्टिकोनातुन कामठी बस स्थानकात पोलीस चौकी उभारणे गरजेचे आहे.
-कामठी बस स्थानकाचा उदघाटन होऊन 48 वर्षे लोटले तरीही कामठी बस स्थानकात अजूनही विविध सोयी सुविधांचा अभाव असल्याने प्रवासी सुरक्षा धोक्यात असल्याचे दिसून येते.या बस स्थानकाला अजूनही नामफलक नाही, परिसरात पोलीस चौकी नाही, रात्री मद्यपीचा बाजार भरत असल्याने दारूच्या बाटलांचा उच्छाद दिसून येतो.या परिसरात कामठी नगर परिषद च्या पाण्याच्या टाकीचा पाणी वाहत असल्याने पावसाळा सोडून इतर वातावरणातही किचड्मय स्थिती असते, रस्ता रखडलेला असल्याने बस अपघातिला निमंत्रक ठरते.