कोदामेंढी :- अरोली – कोदामेंढी जि.प.क्षेत्र व कोदामेंढी पं.स.क्षेत्र परिसरातील गट ग्रा.पं.तांडा अंतर्गत येणाऱ्या श्रीखंडा येथे एक वर्षापुर्वी श्रीखंडा ते इजनी या दोन गावांना जोडणारा व या दोन गावांसह परिसरातील गावांचीही उन्हाळ्यात पाण्याची पातळी टिकून राहून गावकऱ्यांना मुबलक पाणी मिळावे या हेतूने पुल कम बंधारयाचे काम एक वर्षांपूर्वी करण्यात आले.
मात्र पाणी अडविणारया पाट्या,नदीचे पाणी आटल्यानंतर मे महिन्यात टाकण्यात आल्याने बंधारयात पाणी अडलेच नसल्याचे श्रीखंडा येथील रहिवासी व गट ग्रा.पं.तांडा चे ग्रा.पं.सदस्य श्याम बांते यांनी सांगितले.