पोरवाल कॉलेज ते भोयर कॉलेज पर्यंतच्या मार्गावर गतिरोधक नसल्याने वाहनचालक सुसाट

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– गतिरोधक व सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी

कामठी :- कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या एस के पोरवाल कॉलेज चौक ते भोयर कॉलेज वळण मार्गावर शाळा, महाविद्यालय,औद्योगिक प्रशिक्षण संस्था असून या मार्गाहून नवीन कामठी परिसरातून येणाऱ्या नागरिकांसह शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची रेलचेल दैनंदिन मोठ्या प्रमाणात असते त्याचबरोबर ड्रॅगन पॅलेस टेम्पल ला भेट देणाऱ्या नागरिकांचीही संख्या मोठ्या प्रमाणात आवागमन करीत असतात.मात्र या मार्गावर वाहतूक पोलिसांसह स्थानिक पोलिसांचे कुठलेही नियंत्रण नसल्याने या मार्गाहून वाळूने लादून भरलेले तसेच इतर जड वस्तूची वाहतूक जड वाहनाने होत असून जड वाहने सुसाट वेगाने धावत आहेत.नुकत्याच मागिल महिन्यात भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत एका 18 वर्षीय विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यु झाला तर दुसऱ्या विद्यार्थ्याला कायमचे अपंगत्व आले आहे.या मार्गाहून सुसाट वेगाने धावत असलेल्या वाहनामुळे शालेय तसेच महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन ये जा करीत असल्याने विद्यार्थ्याना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.करिता पोरवाल कॉलेज जवळील ड्रॅगन पॅलेस टेम्पल च्या स्वागत द्वार पासून ते भोयर कॉलेज वळण मार्गा पर्यंत ठिकठिकाणी गतिरोधक तसेच सी सी टीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी स्थानिक नागरिकासह येथील प्रोग्रेसिव्ह मूव्हमेंट तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर सौंदर्यीकरण समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

मागील काही महिन्यापासून रमानगर रेल्वे उडान पुलाचे कामे प्रगतीपथावर असल्याने या मार्गावरील वाहतूक दाराना पोरवाल कॉलेज चौक ते भोयर कॉलेज मार्गे ये जा करावी लागते ज्यामुळे या मार्गाहुन वाहतूक दारांची रेलचेल वाढली आहे.तसेच या मार्गाहून वजनदार तसेच क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक असलेली वाहने धावत असल्याने या मार्गावर दैनंदिन किरकोळ अपघात होत असतात तर नुकतेच झालेल्या अपघाती मृत्यूच्या घटनेने सर्वांचे जीव हादरले आहेत तेव्हा अशा घटनेची पुनरावृती न व्हावी यासाठी स्थानिक पोलीस विभागाने गांभीर्याची भूमिका घेत पोरवाल कॉलेज चौक ते भोयर कॉलेज टी पॉईंट मार्गा पर्यंत जागोजागी सी सी टीव्ही कॅमेरे तसेच गतिरोधक लावण्यात यावे अशी मागणी प्रोग्रेसिव्ह मूव्हमेंट चे संयोजक राजेश गजभिये, सुमित गेडाम,प्रमोद खोब्रागडे,उदास बन्सोड, कोमल लेंढारे,मंगेश खांडेकर,गीतेश सुखदेवें, विकास रंगारी, आनंद गेडाम,राजन मेश्राम,मनोज रंगारी, रायभान गजभिये, अनुभव पाटील, दिपंकर गणवीर,सुभाष सोमकुवर, आदींनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विकसित भारत संकल्प यात्रा संवाद कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित

Sat Dec 9 , 2023
नागपूर :- विकसित भारत संकल्प यात्रा उपक्रमात आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या संवाद कार्यक्रमात दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते. नागपुरात महा रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आलेल्या हजारोंच्या संख्येतील तरुणाईने हा संवाद विद्यापीठाच्या परिसरातील भव्य व्यासपीठावर बघितला. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगल प्रभात लोढा, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com