अमरावती :- अमरावती येथील गोल्डन फायब्रेस या कंपनीतील असेच एक उदाहरण कामगारांना झालेल्या विषबाधेच्या निमित्ताने समोर आले आहे.
काल या कंपनीतील कामगारांना कॅन्टीनमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणातून विषबाधा झाली सुमारे २०० कामगारांना या विषबाधेतून उलट्या होऊ लागल्या आणि कंपनीचे मॅनेजर रावत यांचे सदर प्रकरण आतल्या आत दाबण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू झाले.परंतु मनसे पदाधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे कामगारांना कंपनीतून रुग्णालयात हलवण्यात आले व प्राथमिक उपचार देण्यात आले.विषबाधा हा गंभीर मुद्दा होताच परंतु कामगारांचा उद्रेक मॅनेजर रावत यांच्या विरोधात जरा जास्तच होता.हे रावत एक्स सर्विस मॅन आहेत म्हणे आणि पुरेपूर कामगारांवरती स्वतःचा माज झाडतात.
कंपनीचे मालक अनुज बियानी यांनी दिलेल्या बेछूट स्वातंत्र्याने कंपनीचे कॅन्टीन हेच चालवतात,कंपनीच्या ट्रान्सपोर्ट मधून पैसे हे उकळतात,कंपनीच्या विविध कॉन्ट्रॅक्ट मध्ये यांचीच भागीदारी आणि त्यात कंपनीत शेकडोच्या संख्येने असलेल्या महिला कामगारांना अश्लील शेरेबाजी करत वागवतात.या सर्व प्रकाराला अनुसरून आज महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेतर्फे कंपनीच्या गेटवर ठिय्या आंदोलन घेण्यात आले. कामगारांचा उद्रेक पाहून प्रशासन खडबडून जागे झाले आणि महसूल,कामगार,फॅक्टरी इन्स्पेक्टर,आरोग्य अश्या शासनाच्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची मनसे पदाधिकाऱ्यांसोबत कंपनीत बैठक झाली व कामगारांच्या आजवर प्रलंबित असलेल्या सर्व मागण्यांवर पहिल्यांदाच रीतसर चर्चा झाली.
कामगारांची मागणी होती की रावत यांना कंपनीतून तात्काळ बाजूला करावे ही मागणी लावून धरत कंपनीने रावत यांना तात्पुरते कामातून बाजूला केले आहे.परंतु भविष्यात जर का रावत कामावर रुजू झाले आणि कामगारांची पिळवणूक करण्याचा प्रयत्न केला तर मात्र उद्रेक होईल असा इशारा कामगारांनी कंपनी व्यवस्थापनाला यावेळी दिला.
गोल्डन फायब्रेस मध्ये घडत असलेला प्रकार हे एकमेव उदाहरण नसून महाराष्ट्रातल्या विविध एमआयडीसीमध्ये विविध मालकांच्या मॅनेजरची अशीच मुजोरी सुरू आहे,अश्या मुजोर व्यवस्थापनांचा माज उतरवण्याचा विडा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिकांनी उचलला असून येणाऱ्या काळात जिथे कुठे असा प्रकार घडेल तिथे मनसेची लाथ नक्की बसेल.