संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 03:- संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वात मोठे विधानसभा मतदार संघ मानले जाणाऱ्या कामठी तालुक्यातील अतिशय वर्दळी महत्वाचे असलेले शासकीय कार्यालय म्हणजे कामठी तहसिल कार्यालय आहे.कामठी तहसिल कार्यालयातील रिक्त पदांचे ग्रहण हे सुटता सुटेना चे दिसत आहे .आगामी ग्रा प निवडणुका तोंडावर असून प्रभाग रचना प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आरक्षण प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. त्यातच निवडणूक विभागाचे नायब तहसिलदार एस एम कावटी यांची मागील वर्षीच्या ऑगस्ट महिण्यात वर्धा तहसील ला नायब तहसीलदार म्हणून बदली झाली तर बदली होऊन जवळपास 10 महिन्याचा कालावधी लोटत आहे मात्र त्यांच्या रिक्त ठिकाणी अजूनही पदभरती झाली नसल्याने हे पद अजूनही रिक्त आहे . तसेच नुकतेच महसूल चे नायब तहसीलदार रणजित दुसावार यांची पारशिवणी तहसील कार्यालयात बदली झाली असून त्यांचे पद अजूनही रिक्त असून प्रभारी स्वरूपात नायब तहसिलदार अमर हांडा सांभाळत आहेत. तालुक्याच्या सर्वांगीण विकासाची जवाबदारी ही तहसिल कार्यालयाची असते .अनेक दाखले हे तहसिल कार्यालयातून दिले जातात , निवडणुका तोंडावर असून पावसाळा सुदधा सुरू होणार आहे. मात्र या तहसिल कार्यालयातील रिक्त पदांचा ग्रहण सुटत नसल्याची एक शोकांतिकाच म्हणावी लागेल.
कामठी तालुक्यातील अनेक शासकीय कार्यालयांना रिक्त पदानी ग्रासले आहे त्यामुळे तालुक्याच्या विकासाला खीळ बसली आहे .कामठी तहसिल कार्यालयात असलेले रिक्त पदे अजूनही न भरल्याने आश्चर्याच वाटते.या तहसिल कार्यालयात मुख्य तहसिलदारांसह नायब तहसीलदारांची पाच पदे मंजूर आहेत .यातील नायब तहसीलदार एस एम कावटी यांची वर्धा ला बदली झाल्याने हे पद अजूनही रिक्त असून त्यांचे रिक्त पद नायब तहसीलदार नायब तहसीलदार आर उके प्रभारी स्वरूपात सांभाळत आहेत..या रिक्त पदामुळे अतिरिक्त पदभार असलेल्या नायब तहसिलदार उके सह निवडणूक विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कामांचा ताण वाढत आहे .