संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान : –पोलीस स्टेशन अंतर्गत पश्चिमेस १० कि मी अंतरावर असलेल्या वेकोलि डुमरी रेल्वे कोळसा यार्ड येथे जयेंद्र हिरणवार यांनी ठेवलेला नादुरूस्त पे लोडर मशीन चे दोन बँटरी व १५० लिटर डिझेल असा एकुण ३५ हजार रूपयांचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्यांने चोरून नेल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी च्या तक्रारी वरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आरोपीचा शोध घेत आहे.
प्राप्त माहिती नुसार जयद्र प्रकाश हिरणवार याचा २०२२ पासुन डुमरी रेल्वे साईड येथे काम सुरु झाल्याने जयद्र हिरणवार यांनी वेकोलि डुमरी रेल्वे कोळसा यार्ड येथे चार पे लोडर मशीन घेऊन जाऊन काम सुरू केले होते. आणि ३१ मार्च ला काम संपल्या ने जयद्र हिरणवार याने आपले तीन पे लोडर मशीन व काही बारीक सामान वापस घेऊन गेले. परंतु एक पे लोडर मशीन ब्रेक डाऊन झाल्यान तेथेच ठेवली असुन तिच्यात १५० लीटर डीजल होते. गुरूवार (दि.१६) जुन ला सकाळी १०.३० वाजता दरम्यान जयेंद्र हिरण वार हा आपल्या पे लोडर मशीन आणण्याकरिता गेला असता तिथे पे लोडर मशीन च्या दो एक्ससाईट कंपनी च्या बॅटरी न दिसल्याने व डिझल टॅंक मध्ये भरलेला १५० लीटर डीजल न दिसल्याने जयेंद्र हिरण वार हयाने आजु बाजुच्या लोकांना विचारपुस केली असता समाधान कारक उत्तर मिळाले नाही. जयेंद्र हिरणवार हयाचे पे लोडर मशीन मध्ये लावलेल्या दो एक्साईट कंपनी ची बॅटरी किंमत अंदाजे २०,००० व डिझेल टॅंक मध्ये भरलेला १५० लिटर डीझल किंमत अंदाजे १५,००० रूपये असा एकुण अंदाजे किंमत ३५,००० रूपयाचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्यां ने चोरून नेल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी जयेंद्र प्रकाश हिरणवार हयांच्या तोंडी तक्रारी वरून अज्ञात आरोपी विरुद्ध ३७९ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे.