गद्दारीचा किडा, मंगलप्रभात लोढा… राष्ट्रवादी काँग्रेसची मंगलप्रभात लोढा यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी…

मंगलप्रभात लोढा यांच्या मतदारसंघातच राष्ट्रवादीचे आंदोलन…

मुंबई  :- गद्दारीचा किडा मंगलप्रभात लोढा… पन्नास खोके एकदम ओके… छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो अशा घोषणा देत मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या विरोधात त्यांच्याच मलबार हिल विधानसभा मतदारसंघात जोरदार आंदोलन करण्यात आले.

भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेची तुलना एकनाथ शिंदे यांच्या गद्दारीशी केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आज पुन्हा एकदा आक्रमक झालेली पहायला मिळाली.

मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष नरेंद्र राणे व कार्याध्यक्षा राखी जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज मंगलप्रभात लोढा यांच्या मतदारसंघातच हे जोरदार आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, मुंबई युवती अध्यक्षा अदिती नलावडे, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे, ओबीसी सेलचे उपाध्यक्ष राज राजापूरकर, प्रदेश संघटक सचिव भालचंद्र शिरोळे, मुंबई उपाध्यक्ष बाप्पा सावंत, मुंबई विद्यार्थी अध्यक्ष प्रशांत दिवटे, मुंबादेवी तालुकाध्यक्ष प्रविण ठाकूर, मलबार हिल तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, वरळी तालुकाध्यक्ष रवी मयेकर, दक्षिण मुंबई अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अयुब मेमन,मुंबई सोशल मिडिया समन्वयक दिपक पारडीवाला आदींसह पक्षाचे पदाधिकारी, वॉर्ड अध्यक्ष व कार्यकर्ते उपस्थित होते.

तर दुसरीकडे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश कार्यालयाच्या बाहेर मंगलप्रभात लोढा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बालकांच्या गोवर प्रतिबंधात्मक लसीकरण अभियानाला गती, आतापर्यंत १८९९४७ घरांचे सर्वेक्षण : पालकांनो लसीकरणासाठी पुढे या

Thu Dec 1 , 2022
नागपूर :- राज्यात काही भागात गोवर (मीझल्स) ची साथ पसरत असल्याने महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे गोवर संसर्गापासून सुरक्षेच्या दृष्टीने नागपूर शहरातील बालकांच्या प्रतिबंधात्मक लसीकरण अभियानाची सुरुवात करण्यात आली असून या अभियानाला गती देण्यात येत आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभिनयासाठी ९३० पेक्षा अधिक आशा वर्कर्स दहाही झोन निहाय घरोघरी जाऊन सर्वेक्षण करीत आहेत. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com