विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस परिसरात ‘भीम महोत्सव’चे आयोजन

संदीप कांबळे,कामठी
-11 एप्रिल ते 16 एप्रिल पर्यंत विविध शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
-शनिवार दिनांक 16 एप्रिल ला शिवा मोहोड यांचा ‘बाबासाहेबांचा जयजयकार ‘स्वरातून बाबासाहेबांना संगीतमय मानवंदना
कामठी ता प्र 9:-परमपूज्य विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र कामठी येथे दिनांक 11 एप्रिल ते 16 एप्रिल पर्यंत मोठ्या प्रमाणात ‘भीम महोत्सव’चे आयोजन करण्यात आले आहे.या भीम महोत्सव अंतर्गत विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचा समाविष्ट करण्यात आले आहे.अशी माहिती ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा , ड्रॅगन पॅलेस टेम्पल च्या प्रमुख माजी राज्यमंत्री ऍड सुलेखाताई कुंभारे यांनी पत्रकाद्वारे दिली.
दिनांक 11 एप्रिल ला सकाळी 11.30 वाजता मधुरम सभागृह, हिंदी मोरभवन,झांशी राणी चौक नागपूर येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त मानवंदना देण्यात येईल तसेच बहुजन रिपब्लिकन एकता मंच च्या 16 व्या वर्धापन दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.या समारंभाचे उदघाटन मराठा युवा मंच चे अध्यक्ष राजे जयसिंह भोसले करणार आहेत तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बहुजन रिपब्लिकन एकता मंच च्या संस्थापिका, संयोजिका व माजी राज्यमंत्री ऍड सुलेखाताई कुंभारे राहतील.तर प्रमुख पाहुणे म्हणून जमाते इस्लामी हिंद चे अध्यक्ष डॉ मोहम्मद अनवर सिद्दीकी व गुरुदेव सेवा मंडळाचे मुख्य प्रचारक ज्ञानेश्वर रक्षक कार्यक्रमात उपस्थित राहून मार्गदर्शन करतील.तसेच बहुजन रिपब्लिकन विचारांच्या अनेक नेत्यांना बहुजन रिपब्लिकन एकता मंच च्या वर्धापन दिनानिमित्त आमंत्रित करण्यात आले आहे.
मंगळवार दिनांक 12 एप्रिल विद्यार्थी दिनानिमित्त विद्यार्थ्यांकरिता परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित ऑनलाईन प्रश्नमंजूशा चे आयोजन करण्यात आले आहे.या परीक्षेमध्ये नागपूर जिल्ह्यातील जवळपास 5 हजाराहून जास्त विद्यार्थी सहभागी होतील अशी अपेक्षा आहे.हा कार्यक्रम प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात येत आहे.कामठी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या वतीने परिक्षेमध्ये प्रावीन्यप्राप्त विद्यार्थ्यांना प्रथम पारितोषिक 5000रुपये, द्वितीय पारितोषिक 3 हजार रुपये व तृतीय पुरस्कार 1 हजार रुपये देण्यात येईल.
परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त कामठी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र येथे भीम महोत्सव अंतर्गत बुधवार दिनांक 13 एप्रिल ला रात्री 12 वाजता आकाशात 131 आकाशदिप सोडून बाबासाहेबांना मानवंदना वाहण्यात येईल.
बुधवार दिनांक 14 एप्रिल ला सकाळी 8 वाजता विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल कामठी येथे पुज्यनिय भिक्षु संघाच्या मुख्य उपस्थितीत विशेष बुद्धवंदनेचे आयोजन करण्यात आले आहे.त्यानंतर सकाळी 9 वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक संशोधन केंद्र कामठी येथे परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला ऍड सुलेखाताई कुंभारे यांच्या शुभ हस्ते व समता सैनिक दल यांच्या मुख्य उपस्थितीत माल्यार्पण करून मानवंदना वाहण्यात येईल .सकाळी 10 वाजता विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल कामठी ते पवित्र दीक्षाभूमी नागपूर पर्यंत भीम रॅली चे आयोजन करण्यात आले आहे.ही रॅली डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती कामठी,-जयस्तंभ चौक कामठी-संविधान चौक नागपूर-पवित्र दीक्षाभूमी नागपूर अशी जाईल .सायंकाळी 7 वाजता भव्य भीम रॅली चे आयोजन करण्यात आले आहे.या रॅली कामठी शहरातील प्रबुद्ध नगर मधून शुभारंभ होऊन जयस्तंभ चौक कामठी येथे समापन होईल.या रॅलीमध्ये विविध वस्तीतील नागरिक सहभागी होतील.
शुक्रवार दिनांक 15 एप्रिल ला सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत ओगावा सोसायटी तर्फे मोफत आरोग्य निदान शिबिर व रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार दिनांक 16 एप्रिल ला सायंकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र कामठी येथे ‘बाबासाहेबांचा जयजयकार’या कार्यक्रमातून बाबासाहेबांना संगीतमय मानवंदना देण्यात येणार आहे.कामठी तालुक्यातील घोरपड या गावातील शिवा मोहोड या तरुणाने सतत एक वर्षं सम्राट अशोक, तथागत गौतम बुद्ध व बाबासाहेबांच्या विचारांचा अभ्यास करून या ओबीसी समाजाच्या मुलाने ‘बाबासाहेबांचा जयजयकार’ या गीताचे स्वर-गीत-संगीत दिले आहे.हे गीत नुकतेच टी सिरीज या नामांकित म्युझिकल कंपनीने रिलीन केले आहे.अशा कलाकाराला व्यासपीठ उपलब्ध करून प्रोत्साहित करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.शनिवार दिनांक 16 एप्रिल ला सायंकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत शिवा मोहोड व एस के म्युजिकल बँड ग्रुप स्वर गीत संगीत शिवा मोहोड(टी सिरीज सिंगर फेम) परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना संगीतमय मानवंदना देण्यात येणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

श्रीरामनवमी व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती शांततेत पार पाडा-डीसीपी मनीष कलवानिया

Sat Apr 9 , 2022
संदीप कांबळे, कामठी कामठी ता प्र 9 :- उद्या 10 एप्रिल ला रामनवमी तसेच 14 एप्रिल ला महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे.तेव्हा हे दोन्ही उत्सवाला कुठलेही गालबोट लागणार नाही याची दक्षता घेत हे दोन्ही उत्सव शांततेत पार पाडा असे आव्हान डीसीपी मनीष कलवानिया यांनी नवीन कामठी पोलीस स्टेशन सभागृहात आयोजित बैठकीत व्यक्त केले. या बैठकीला श्री राम नवमी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!