22 वर्षांपासून सुरु आहे आऊटर रिंग रोडचे काम

नागपूर : 1170 कोटी खर्चून निर्माणाधीन 119 किलोमीटर लांबीच्या आऊटर रिंगरोडचे काम 22 वर्षे उलटूनही पूर्ण झालेले नाही, याउलट 701 किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गाचा (नागपूर-शिर्डी) 500 किलोमीटरचा रस्ता अवघ्या 4 वर्षांत वापरासाठी सुरु केला गेला. आऊटर रिंगरोड तयार होण्यासाठी एनएचएआय आणि कंत्राटी कंपन्या प्रयत्नशील आहेत. आतापर्यंत 2 कंत्राटी कंपन्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. तिसऱ्या बन्सल कन्स्ट्रक्शन कंपनीकडून सुरू असलेल्या बांधकामाचा वेगही समाधानकारक नाही.

ओव्हरब्रिज, अंडरब्रिज तयार करण्यास वेळ लागत असल्याचा युक्तिवाद एनएचएआयचे अधिकारी करत आहेत. कामाच्या दिरंगाईमुळे 531 कोटींचा हा प्रकल्प 1170 कोटींवर पोहोचला असला तरी 2023 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. 65 टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा केला जात असून, 5 मोठे ओव्हरब्रिज, 20 छोटे पूल आणि 15 भूमिगत मार्ग तयार करण्यास वेळ लागत असल्याचेही बोलले जात आहे. हा 35 टक्के भाग पूर्ण करण्यासाठी किती कालावधी लागेल या प्रश्नाचे उत्तर ना एनएचएआय किंवा कंत्राटी कंपनीकडे सुद्धा नाही.

कंत्राटदार बन्सल कन्स्ट्रक्शन या कंपनीला काम लवकर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बांधकामाचा वेग वाढल्यास ऑक्टोबर 2023 पर्यंत रिंगरोड पूर्णत: तयार होऊ शकेल, असा अंदाज अधिकारी व्यक्त करत आहेत, परंतु बांधकामाची संथ गती प्रश्न निर्माण करत आहे. काही महिन्यांपूर्वी, एनएचएआयच्या अधिकाऱ्यांनी जून-2023 पर्यंत बांधकाम पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली होती, त्यानंतर ऑगस्ट 2023 पर्यंत बाह्य रिंगरोड तयार होईल असा दावा करण्यात आला होता. आता हा रिंगरोड ऑक्टोबर-23 पर्यंत तयार होण्याची चर्चा सुरु आहे. 2000 साली हा प्रस्ताव देण्यात आला होता. आतापर्यंत 2 कंत्राटी एजन्सी बदलण्यात आल्या आहेत. सोबतच 531 कोटींचा हा प्रकल्प 1170 कोटींवर पोहोचला आहे. अश्या प्रकारे जर आऊटर रिंग रोड चे काम सुरु राहिले तर लवकरच सरकारच्या तिजोरिवर भार पडेल.

रिंगरोडचे बांधकाम दोन भागात विभागले आहे. पहिल्या भागात जामठा ते फेटरी हा 62 किमीचा भाग आणि दुसऱ्या भागात फेटरी ते धरणगाव या भागाचा समावेश आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आऊटर रिंगरोडचे आतापर्यंत 65 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित 35 टक्के कामासाठी कंत्राटदार कंपनीला काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या रिंगरोडवर 5 ओव्हरब्रिज, 20 छोटे पूल आणि 15 भूमिगत मार्ग बांधण्यात येणार आहेत. मात्र काम संथ गतीने सुरू आहे.

या रिंगरोडवरील प्रस्तावित पूल तयार होण्यास वेळ लागत आहे. बन्सल कन्स्ट्रक्शन कंपनीला काम लवकर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ऑक्टोबर-2023 पर्यंत बांधकाम पूर्ण होण्याची शक्यता आहे, अशी माहिती एनएचएआय चे प्रकल्प अधिकारी अरविंद काळे यांनी दिली.

कासवगतिने काम सुरु

आऊटर रिंगरोडचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने 2000 साली तयार केला होता, मात्र बांधकामाला सुरुवात झाली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दिरंगाईनंतर आऊटर रिंगरोड तयार करण्याची जबाबदारी एनएचएआयकडे देण्यात आली. एनएचएआयच्या प्रयत्नांमुळे बांधकामाचे भूमिपूजन झाले, मात्र रिंगरोडचे काम होऊ शकले नाही. कामात दिरंगाई झाल्यामुळे दोन कंत्राटी कंपन्यांना एनएचएआय ने संपुष्टात आणले आहे. तिसरी बन्सल कन्स्ट्रक्शन कंपनी सध्या आऊटर रिंगरोड तयार करण्यात गुंतलेली आहे. ही कंपनीही निकष पूर्ण करत नाही. या कंपनीकडून संथ गतीने काम सुरू असल्याने रिंगरोड तयार होण्यास बराच कालावधी लागण्याची अपेक्षा आहे.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

11वें वेतन समझौता,CIL ने यूनियन से मांगे नाम

Mon Feb 13 , 2023
– कोयला कामगारों के 11वें वेतन समझौते के तहत अब तक 19 फीसदी मिनिमम गारंटीड बेनीफिट (एमजीबी) पर ही सहमति बनी है नई दिल्ली – कोयला कामगारों के 11वें वेतन समझौते के तहत अब तक 19 फीसदी मिनिमम गारंटीड बेनीफिट (एमजीबी) पर ही सहमति बनी है, लेकिन यह अभी लागू नहीं हो सका है। इधर, कामगारों की सामाजिक सुरक्षा, भत्तों […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com