इकोटुरिझमच्या कामांना गती द्यावी – दत्तात्रय भरणे

वनविभागातील रिक्त पदभरतीसंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश

मुंबईदि. 19 : पर्यावरण पूरक पर्यटन (इकोटुरिझम) अंतर्गत कामांना गती देवून वन विभागातील 2 हजार 762  रिक्त पदभरतीसंदर्भात विभागाने तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

            मंत्रालयातील दालनात वन विभातील रिक्त पदे तसेच इकोटुरिझम प्रस्तावासंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते. या बैठकीला नागपूर येथील महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विकास गुप्ता, वन विभागाचे उपसचिव गजेंद्र नरवणे यावेळी उपस्थित होते.

               राज्यमंत्री श्री.भरणे म्हणालेनिसर्ग पर्यटन विकास मंडळांतर्गत इकोटुरिझम चे प्रस्ताव वन विभागाकडे आहेत या प्रस्तावासाठी  निधीची आवश्यकता आहे हे लक्षात घेता याबाबत वित्त विभागाकडे वन विभागाने मागणी करावी. नांदेड जिल्ह्यातील टिटवी निसर्ग पर्यटन केंद्रपुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील मिरवडीअकोला जिल्ह्यातील कुटासाकोल्हापूर जिल्ह्यातील  करवीर तालुक्यातील वडगांवपुणे जिल्ह्यातील श्रीक्षेत्र भामचंद्र डोंगरपुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील मौजे वाल्हा येथील श्री भवानीमाता परिसरपुणे जिल्ह्यातील शंभु महादेव हरेश्वर मंदिरअमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील सिंरोंभा येथील अप्पर वर्धा धरण, लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील संजिवनी बेटपुणे जिल्ह्यातील वाडे बिल्होई, धुळे जिल्ह्यातील लांडोर बंगलावसई येथील तुंगारेश्वर देवस्थान या प्रलंबित प्रस्तावाबाबत वन विभागाने केलेल्या कार्यवाहीचाही यावेळी आढावा घेण्यात आला.

          राज्यमंत्री श्री.भरणे यांनी वनसरंक्षक व सर्व्हेक्षक संवर्गातील रिक्त पदे,पशुसंवर्धन सहायक आयुक्तउपायुक्त गट अ पदभरतीवनपाल संवर्गातून वनक्षेत्रपाल संवर्गात तदर्थ पदोन्नती देणेशाखा  अभियंता या संवर्गातून उपवनअभियंता या संवर्गात तदर्थ पदोन्नती देणेवन परिक्षेत्र अधिकारी संवर्गाचे सेवाप्रवेश नियमात सुधारणा करणेवन अधिकाऱ्यांच्या विभागीय परीक्षा नियमात सुधारणा करणे, वनपाल व वनरक्षक संवर्गाचे सेवाप्रवेश नियमात सुधारणा करणे, वन विभागात जलद कृती दल स्थापन करण्याच्या प्रस्तावासंदर्भातील सद्य:स्थितीवन परिक्षेत्र अधिकारी संवर्गाची राज्यस्तरीय ज्येष्ठता सूचीवनसंरक्षणाचे काम करताना मृत्यू झालेले अधिकारी कर्मचारी यांना नुकसान भरपाई व आर्थिक मदत देण्याबाबत यावेळी आढावा घेण्यात आला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंत्यांची रिक्त पदे तातडीने भरणार - दत्तात्रय भरणे

Wed Jan 19 , 2022
मुंबई, दि. 19 : राज्यातील पायाभूत विकासाला चालना देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता, सहायक अभियंता श्रेणी-2 व कनिष्ठ अभियंत्यांची १ हजार २४०, स्थापत्य अभियांत्रिकी सहायकची १ हजार ५३६ रिक्त पदे भरणे आवश्यक आहे. या विभागाचा आकृतीबंध तयार झाला असून लवकरच पदभरतीची कार्यवाही करणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बैठकीत दिली.           मंत्रालयातील दालनात शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता, सहायक अभियंता श्रेणी-2, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक वर्गातील रिक्त पदे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!