बल्लारपूरच्या नवीन न्यायालय इमारतीचा मार्ग मोकळा,आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

– न्यायालय इमारत बांधकामासाठी ३६ कोटी ७० लक्ष ७३ हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता

चंद्रपूर :-‘दिला शब्द केला पूर्ण’ यासाठी सुपरिचित असलेले आ. सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा दिलेला शब्द पूर्ण केला आहे. त्यांच्या पाठपुराव्यामुळे बल्लारपूरच्या नवीन न्यायालयीन इमारतीचा मार्ग मोकळा झाला असून यासाठी ३६ कोटी ७० लक्ष ७३ हजार रुपये निधीची राज्यसरकारने मान्यता दिली आहे. एखादा विषय हाती घेतला की तो पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा करण्यात आ.सुधीर मुनगंटीवार यांचा हातखंडा आहे. त्यांच्या या खास कार्यशैलीची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे.

बल्लारपूर येथे नवीन न्यायालयीन इमारत बांधण्यासाठी ३६ कोटी ७० लक्ष ७३ हजार रुपयांच्या अंदाजित खर्चाच्या कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचे शासन निर्णयात म्हटले आहे. ही नवीन न्यायालयीन इमारत बल्लारपूरच्या वैभवात भर पाडणारी असेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. या इमारतीमध्ये तळमजला, त्यावर तीन मजले, पाच कोर्ट हॉलचा समावेश असेल. याशिवाय अग्नीशमन यंत्रणा, सीसीटीव्ही, वातानुकुलित व्यवस्था, लिफ्ट, पाणीपुरवठा, जलसंचय आदींचा समावेश असणार आहे.

बल्लारपूर येथे नवीन न्यायालयीन इमारत व्हावी, येथे अद्ययावत सोयीसुविधा निर्माण व्हाव्यात, सुसज्ज अशा कोर्टरुम असाव्यात, यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर त्यांनी नियमित पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून इमारतीच्या बांधकामाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. न्यायदान करणारी यंत्रणा आणि न्याय मागण्यासाठी येणारा सर्वसामान्य माणूस यांची मुलभूत सोयीसुविधांच्या बाबतीत गैरसोय होणार नाही, याची पूर्ण काळजी बांधकामादरम्यान घेतली जाईल, असा विश्वास आ. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

श्री दत्तात्रेय महाराज पालखीचे स्वागत करण्यात आले

Sun Dec 15 , 2024
कन्हान :- भाविक मंच कांद्री-कन्हान व्दारे श्री दंत्त मंदीर कांद्री येथे हरिनाम भागवत सप्ताह सह श्री दत्तात्रेय जयंती महोत्सव निमित्य श्री दत्तात्रेय महाराज पालखी कांद्रीच्या मुख्य मार्गाने भ्रमण करताना जागो जागी स्वागत केले. तसेच जय शीतला माता मंदिर मेन रोड कांद्री कन्हान येथे जलोष्षात पुजा पाठ आणि अल्पोहार, प्रसाद वितरण करून स्वागत करण्यात आले. शनिवार (दि.१४) डिसेंबर २०२४ ला सकाळी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!