– नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या शतक महोत्सवी सोहळ्यात होणार सहभागी
– राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीत ‘प्राणिती’ या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी उपराष्ट्रपती करणार मार्गदर्शन
नवी दिल्ली :- उपराष्ट्रपती जगदीप धनखड येत्या 4 ऑगस्ट 2023 रोजी, नागपूर दौऱ्यावर जाणार आहेत. तिथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शतक महोत्सवी समारंभात सहभागी होतील.
तसेच, रेशीमबागेतील कविवर्य सुरेश भट सांस्कृतिक केंद्रालाही ते भेट देणार आहेत.
त्यानंतर, उपराष्ट्रपती राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीत, “प्राणिती’ ह्या भारतीय महसूल सेवा विभागाच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांसाठीच्या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन देखील करतील.