आशीष राऊत खापरखेडा
खापरखेडा – घरासमोर अंगणात ठेवलेले 30 लोखंडी पाईप चोरीच्या प्रकरणात खापरखेडा पोलिसांनी मंगळवारी सकाळी दोन आरोपींना अटक करण्यात आली. सिल्लेवाडा येथील निवासी रामराव गुलाबराव ढोले यांनी खापरखेडा पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली होती. तक्रारीवरून पोलीस स्टेशन येथे कलम 379 भादवी अन्वये गुन्हा नोंद करून अज्ञात आरोपी चा शोध काम सुरू केले. या गुन्हयाचे तपासात पोलीस स्टेशन खापरखेडा येथील डी.बी. पथक सिल्लेवाडा परिससरात पेट्रोलिंग करीत असता त्यांना दोन संशयीत व्यक्ती या गुन्ह्यात लिप्त असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी आरोपी ईश्वर उर्फ इशु सुधाकर ढोले वय 30 वर्ष आणि बादल शेकचंद वाघधरे वय 25 वर्ष, दोन्ही रा. सिल्लेवाडा वस्ती यांना ताब्यात घेवुन त्यांना सदर गुन्हयाचा अनुषंगाने विचारपुस केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबुली दिल्ल्याने व चोरीचे लोखंडी पाईप लपवुन ठेवले आहे. असे सांगितल्यान त्यांच्या कडुन लोखंडी पाईपा किमती 8,800 /- रू च्या माल जप्त करण्यात आला. सदर गुन्हया मध्ये दोन्ही आरोपीना अटक करण्यात आली आहे. पुढील गुन्हयाचा तपास पो.हवा नावेद खान पो.स्टे खापरखेडा करीत आहे.
सदरची कामगीरी विजयकुमार मगर पोलीस अधिक्षक नागपूर ग्रामीण , राहुल माकणीकर अपर पोलीस अधिक्षक, राजेंद्र चौव्हान उपविभागीय पोलीस अधिकारी, अति. कार्यभार कामठी विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली हृदयनारायण यादव पोलीस निरीक्षक, डी.बी पथकचे सहायक पोलीस नीरिक्षक दिपक कांक्रेडवार, पोलीस हवालदार उमेश ठाकरे, पोलीस हवालदार आशिष भुरे, नावेद खान पो. ना. प्रमोद भोयर, राजू भोयर, मुकेश वघाडे, पो.शि. नूमान शेख, शेखर वानखेडे यांनी पार पाडली.