प्रतिनिधी किशोर साहू,
अरोली: श्रीराम साखर कारखाना म्हणून मौदा तालुक्यात प्रसिद्ध असलेल्या बाबदेव येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही तीळसंक्रात निमित्य उद्या 16 जानेवारी गुरुवारपासून दोन दिवसीय मंडईला सुरुवात होत आहे.
16 जानेवारी गुरुवार दुपारी दोन वाजता आमदंगल, 17 जानेवारी शुक्रवारला सकाळी दहा वाजता पासून शाहीर सुरज नवघरे विरुद्ध शाहीर शिवानी यांच्या दुय्यम राष्ट्रीय खडा तमाशा चे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ,खासदार श्यामकुमार (बबलू)बर्वे ,सहउद्घाटक म्हणून अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल ,माजी आमदार टेकचंद सावरकर ,जिल्हा परिषद सदस्य शालिनी शेषराव देशमुख, कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र गोडबोले, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश भोयर ,व्यंकटेश्वरा पावर युनिट टू चे चेअरमन बबलू गुजर, प्रमुख अतिथी म्हणून तापेश्वर वैद्य, मनीराम यादव ,कीर्ती पाय तोडे, नरेश मोटधरे ,राजेश लांडे प्रसन्न (राजा )तिडके ज्ञानेश्वर वानखेडे ,नितेश वांगे ,राजेश ठवकर ,ग्रामपंचायत बाबदेव सरपंच स्नेहल अनिल वरखडे, उपसरपंच प्रमोद महादुले, धर्मेंद्र येळणे ,हेमराज सावरकर ,दिगां बर बांगळकर, अरुण वैद्य ,निलेश भोले, शुभम तिघरे, उमेश गायधने ,बाळकृष्ण खंडाईत, शेषराव देशमुख, आनंद लेंडे, डिंपल सतीश बावनकुळे सह गावातील , परिसरातील ,सामाजिक व राजकीय ,पदाधिकारी ,कार्यकर्ते गण उपस्थित राहणार असून या दोन दिवसीय मंडई उत्सवाच्या लाभ घेण्याचे आव्हान तेली समाज पंच कमिटी चे अध्यक्ष नरेंद्र सावरकर, उपाध्यक्ष रामचंद्र डांगरे, सचिव प्रशांत डांगरे आश्विन (गोलू )डांगरे ,राहुल येळणे ,श्रीकांत गायधने, मोहन लेंडे ,राजू वैद्य ,निखिल कुंभलकर सहसमस्थ ग्रामवासियांनी केले आहे. यशस्वीतेसाठी आयोजक तथा ग्रामस्थ परिश्रम करताना दिसत आहेत.