संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- आजच्या आधुनिक युगात सर्वत्र सोशल मीडियाचा पेव वाढला असून सर्वांच्या हाती मोबाईल आले आहे आणि त्यात असलेल्या इंटरनेट ने सर्व जग जवळ आणता आले त्यातच सध्या सोशल मीडियावर स्टुडिओ घिब्ली च्या वैशिष्ट्य पूर्ण शैलीत तयार केलेल्या छायाचित्राचा ट्रेंड सध्या मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे. तर या घिब्लि इमेजस चा कामठी तालुक्यात लहानापासून ते अबालवृद्ध पर्यंत चांगलाच ज्वर वाढला आहे.
फेसबुक,इन्स्ट्राग्राम व्हाट्सएप सारख्या सोशल मीडिया प्लॅटफार्मर नवयुवक ,नवयुवती सह आधुनिक अबालवृद्ध सुद्धा या ट्रेंड मध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत.विशेष म्हणजे तालुक्यातील प्रसिद्ध व्यक्तींची छायाचित्रे देखील या शैलीत रूपांतर करून व्हायरल केली जात आहेत.स्टुडिओ घिब्लि हा जगप्रसिद्ध जपानी एनिमेशन स्टुडिओ आहे ज्याची चित्रपट स्पिरिटेड अवे आणि माय मेंबर टोटोरो त्यांच्यासारख्या जादुई कथा आणि स्वप्नाळू दृश्यासाठी ओळखले जातात या स्टाईल मध्ये नैसर्गिक सौंदर्य मनोहर रंगसंगती आणि कल्पकतेचा अनोखा संगम असतो .इन्स्ट्राग्राम वर शेअर केल्या जाणाऱ्या धीब्लि इमेजेस मध्ये याच सौंदर्य शैलीचा प्रभाव पाहायला मिळतो .तरुणाई आपल्या प्रोफाईल पिक्चर्स आणि पोस्टमध्ये या शैलीचा अवलंब करीत आहे.यामुळे डिजिटल फ्लॅटफॉर्मवर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि विचारांना एक वेगळा कलात्मक स्वरूप मिळत असते.या ट्रेंडचा प्रभाव केवळ तरुणाई पुरता मर्यादित न राहता मध्यमवर्गीय सह आधुनिक अबाल वृद्ध सुदधा या ट्रेंड मध्ये सहभागी दिसून येत आहेत.