संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :-पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा विद्यार्थी ज्ञानेश ओमप्रकाश जयस्वाल या विद्यार्थ्याने जी जी मेन्स २०२५ मध्ये ९९.९२२% मिळवून महाविद्यालयाचे नाव लौकीक केले.. या यशाबद्दल पोरवाल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विनय चव्हाण उप प्राचार्य डॉक्टर सुधीर अग्रवाल व पर्यवेक्षक व्ही .बी. वंजारी यांनी ज्ञानेश जयस्वाल चे अभिनंदन केले आहे
जेईई मेन्स परीक्षा ही संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE) चा पहिला टप्पा आहे. ही परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे घेतली जाते. या परीक्षेतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना एनआयटी आणि आयआयटी सारख्या सरकारी महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळतो.