“अभिजात भाषेचा दर्जा हा ज्ञानेश्वर माऊली, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भाषेचा सन्मान” – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

नागपूर :- सध्या विदर्भ दौऱ्यावर असलेले महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी मराठीसह पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचे आभार मानले आहेत.

“समस्त महाराष्ट्राच्या आणि मराठी भाषेच्या इतिहासात आजचा हा दिवस सुवर्ण अक्षरांनी कोरला जाईल.

संत ज्ञानेश्वर माऊली, संत चक्रधर स्वामी, जगद्गुरू संत तुकाराम यांसह महाराष्ट्रातील अनेक संतांची व समाजसुधारकांची भाषा असलेल्या मराठी भाषेचा अभिजात भाषा जाहीर झाल्यामुळे सन्मान झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, लोकमान्य टिळक, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांसह असंख्य स्वातंत्र्यसैनिक आणि क्रांतिकारक तसेच जनसामान्यांच्या लाडक्या मराठी भाषेचा सन्मान प्रत्येकाला सुखावणारा आहे.

माय मराठीला बहुप्रतिक्षित अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल मी पंतप्रधानांचा आभारी आहे.

पाली आणि प्राकृत, बंगाली आणि आसामी यांनाही अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा मला आनंद आहे.

मराठीला अभिजात भाषा म्हणून मान्यता देण्याच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर, अधिकाधिक लोक, विशेषत: युवक आणि लहान मुले मराठी भाषा शिकतील, बोलतील व या भाषेत लिहतील तसेच मराठी भाषा विश्वभाषा करण्यासाठी प्रयत्न करतील असा विश्वास वाटतो.

या आनंदाच्या प्रसंगी मी राज्यातील जनतेचे आणि जगभरातील मराठी भाषिकांचे अभिनंदन करतो.

महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेच्या वतीने मी पुनश्च केंद्रीय मंत्रिमंडळाचे आणि विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे या निर्णयाबद्दल आभार मानतो, असे राज्यपाल राधाकृष्णन यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भगवान बुद्ध और डॉ.बाबासाहेब आंबेडकर इनकी पवित्र अस्तिधातु कलस महायात्रा का भव्य स्वागत नागपुर में

Fri Oct 4 , 2024
नागपूर :- इंडो एशियन मेत्ता फाउंडेशन द्वारा आयोजित भगवान बुद्ध और डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इनकी पवित्र अस्थि धातु कलश महायात्रा आज नागपुर शहर के कल्पतरु बुद्ध विहार में आगमन हुआ। यह अस्ति कलश महायात्रा दिनांक 10 सितंबर 2024 से पुणे शहर से प्रारंभ होकर कोल्हापुर, सोलापुर, सातारा सांगली, उस्मानाबाद , दर्यापुर, नांदेड़ मंगलूपीर, कारंजा, अकोला, अमरावती, शेगाव, वर्धा चंद्रपुर, यवतमाल आर्वी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!