आदिमांचे नारे-निदर्शने,आंदोलनाने अन्यायाविरुद्ध आवाज बुलंद 

नागपूर :- आदिम हलबा,हलबी जमातीच्या पुर्वजांच्या व्यवसायामुळे झालेल्या कोष्टीकरणाने हलबा जमात घटनात्मक आरक्षणापासून वंचित आहे. या अन्यायाविरुद्ध विविध संघटनांनी वेळोवेळी आपला तीव्र संताप व्यक्त केला तरी भाजप सरकारने न्याय दिला नाही. हलबांवर कोष्टी व्यवसायावरून आजही अन्याय सुरू आहे, असा आरोप आदिमने केला.

या भाजप सरकारच्या अन्यायाविरोधात राष्ट्रीय आदिम कृती समितीच्या वतीने विश्वनाथ आसई, दे. बा. नांदकर ,आदिम नेत्या ॲड. नंदा पराते, माजी उप महापौर दीपराज पार्डीकर,प्रकाश निमजे, ओमप्रकाश पाठराबे,अभय धकाते, धनराज पखाले,नागोराव पराते, महेश बारापात्रे, मुन्ना खडतकर, कृष्णा गोटाफोडे, शकुंतला वट्टीघरे,मंदा शेंडे, विठ्ठल बाकरे ,रवी पराते ,विजय हत्तीमारे,अरविंद गडीकर ,पांडुरंग पराते,न्यानेश्वर दाढे यांच्यसह शेकडो हलबा बांधावांनी नारे-निर्दशने केले.

या आंदोलनात गर्व से कहो हम आदिवासी है. भारत के मूल निवासी है, जितनी जिनकी संख्या भारी हैं.. ऊतनी ऊनकी भागीदारी हैं,आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे,आदिवासी हलबांना न्याय.मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे,आदिवासी हलबांना जमातीचे प्रमाणपत्र मिळालेच पाहिजे, मिळालेच पाहिजे,महाराष्ट्र सरकार.हाय हाय…हाय हाय, केंद्र सरकार.हाय हाय..हाय हाय असे गगनभेदी नारे देण्यात आले.

राष्ट्रीय आदिम कृती समितीच्या वतीने भाजप सरकार विरोधात आक्रोश दाखविण्यासाठी नागपुरात जागोजागी रस्त्यावर नारे-निदर्शने आंदोलनाने करून आदिमांचा आवाज बुलंद केल्या जात आहे. नागपुरात गोळीबार चौक ,नाईक तलाव ,तांडापेठ,विनोबा भावे नगर, नवी मंगळवारी, जुनी मंगळवारी या ठिकाणी विधानसभेवर मोर्चासाठी आदिमांचे आंदोलन अभियान सुरु केले. महाराष्ट्र सरकारने ४५ जमाती पैकी हलबा,माना ,गोवारी ,धनगर,धोबा व ठाकूर या आदिवासी जमातीसह ३३ जमाती क्षेत्रबंधनाबाहेरील असल्याने संविधानिक न्यायापासून वंचित करून ठेवले म्हणून हलबा समाजमध्ये प्रचंड असंतोष आहे. ३३ जमातीतील १ कोटी नागरीकांवर महाराष्ट्रात अन्याय होत आहे. महाराष्ट्रात अनुसूचित जमाती यादीतील ४५ जमाती पैकी ३३ जमाती क्षेत्रबंधनाबाहेरील म्हणून खोटे हा प्रकार संविधान विरोधी आहे.हा आरोप बीजेपी सरकारवर आदिम संघटनांनी केला.

राष्ट्रीय आदिम कृती समितीच्या वतीने आंदोलनासाठी ॲड.राकेश पाठराबे,हरेश निमजे, ,भास्कर चिंचघरे,मनोज हेडाऊ,योगेश गोंन्नाडे ,राजू ताबूतवाले ,ॲड.जितेंद्र वेळेकर, कैलास निनावे, प्रदीप पौनीकर,मोरेश्वर पराते ,बळीराम पराते, ,दिलीप भानुसे, रमेश वडगांवकर,शुभम पौनीकर,कृष्णा पाठराबे,संदीप चिंचघरे ,मनोहर केळवदकर ,गोपाल पौनीकर, माया धार्मिक ,संगीता सोनक,रमेश वरुडकर,राजू आमनेरकर यांनी अथक परिश्रम घेतले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कामठी तालुक्यातील दहा ग्रामपंचायत निवडणुकीत कांग्रेस भाजप ला फिफ्टी फिफ्टी..

Mon Nov 6 , 2023
संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी  – दहा पैकी पाच कांग्रेस तर पाच भाजप चे सरपंच पदी निवड कामठी ता प्र 6 :- काल 5 नोव्हेंबर ला पार पडलेल्या कामठी तालुक्यातील दहा ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आज 6 नोव्हेंबर ला कामठी तहसील कार्यालयात तहसीलदार अक्षय पोयाम यांच्या मुख्य उपस्थितीत झालेल्या मतमोजणीतून जाहीर झालेल्या निकालात सरपंच पदासाठी निवसडणूक रिंगणात असलेल्या 31 उमेदवारांना थेट जनतेतून मतदान […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!