कामठी शहरातील अतिक्रमण चा वेढा दिवसेंदिवस वाढीवर पार्किंग , नो पार्किंग चा प्रश्न अजूनही वाऱ्यावर

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- नागपूर शहर पोलीस आयुक्तालय परिमंडळ क्र 5 अंतर्गत येणाऱ्या कामठी शहरातील अस्ताव्यस्त वाहतुकीला आळा बसत लोकवस्तीतील जडवाहतुक बंदी व्हावी व नागरिकांना सोयीचे व्हावे या मुख्य उद्देशाने माजी पालकमंत्री ना चंद्रशेखर बावनकुळे यांच्या थेट निदर्शनातुन तत्कालीन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या अधिसूचनेनुसार शहरातील 7 मार्गावर सकाळी 9 ते दुपारी 1 व दुपारी 3 ते रात्री साडे सात वाजेदरम्यान जडवाहतुकीस प्रतिबंध शिवाय कामठी शहरातील 8 स्थळी पार्किंग व 3 स्थळी नो पार्किंग झोन निर्माण करण्याच्या आदेशितावरून नगर परिषदच्या वतीने पार्किंग , नो पार्किंग चे फलक सुद्धा लावण्यात आले आहेत तसेच जडवाहतुकीस प्रतिबंध असलेल्या ठिकाणी तशी सोय सुद्धा करण्यात आली आहे मात्र यासंदर्भात स्थानिक पोलीस विभागाच्या अत्यंत वर्दळीच्या परिसरात अस्ताव्यस्त वाहतुकीला बळ मिळत असल्याने नागरिकांना नाहक डोकेदुखीचा त्रास भोगावा लागत आहे .त्याचप्रमाणे या वर्दळीच्या ठिकानातुन एखादया गंभीर अवस्थेतील रुग्णाला उपचारार्थ नेतेवेळी त्या रुग्णाचा रस्त्यातच मृत्यू होण्याच्या स्थितीला नाकारता येत नाही तेव्हा शहरातील पार्किंग व नो पार्किंग च्या दुरावस्थेकडे लक्ष पुरविणे गरजेचे आहे. तसेच कामठी शहरातील अतिक्रमण चा वेढा हा दिवसें दिवस वाढीवर असल्याने शहरातील मुख्य बाजार चौकात अस्तव्यस्त अतिक्रमण वाढले असून अतिक्रमण धारकांनि नगर परोषद प्रशासनाची कुठलिही भीती न बाळगता बिनधास्तपने अतिक्रमित पक्की दुकाने थाटले असून यासह शहरातील अनेक भागात अतिक्रमण करीत असल्याने शहराच्या स्मार्ट सिटी चा प्रश्न हा अधांतरी दिसत असल्याने शहरातील अतिक्रमन काढणे गरजेचे असल्याने येथील नगर परिषद प्रशासन तसेच पोलीस प्रशासनाने यावर गंभीर्याची भूमिका घेणे गरजेचे आहे यासाठी नुकतेच मुख्याधिकारी रमाकांत डाके, वाहतूक पोलीस विभाग चे पोलीस निरीक्षक यादव, जुनी कामठी पोलीस स्टेशन चे पोलिस निरिक्षक कठाळे यांसह संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शहरातील बाजार परिस्थितीची पाहणी करीत अतिक्रमित भागाचा निरीक्षण करीत लवकरच संयुक्त रित्या ठोस पाऊल उचलण्याचे ठरविण्यात आले.

स्थानिक नगर परिषद हद्दीत येणाऱ्या जयस्तंभ चौक ते गोयल टॉकीज चौक , गोयल टॉकीज चौक ते पोलीस लाईन चौक, गांधी चौक, फेरूमल चौक यासारख्या अनेक बाजार पेठेच्या मुख्य मार्गावर अतिक्रमण वाढले असून बिनधास्त पणे दुकाने थाटले जातात तसेच दैनंदिन भाजी मार्केट दुकानदार शुक्रवारी बाजार चौकासह रुईगंज मैदानात बाजार लावत असून येथील मच्ची मार्केट ला निर्धारित मटण मार्केट परिसरात जागा देऊनही जुन्याच ठिकाणी बाजार थाटात आहेत तर गांधी चौकासह फेरूमल चौक परिसरात अतिक्रमणाचा वेढा वाढला असल्याने नागरिकांना पायी जाणे हे सोयीचे नसते तर शुक्रवारी बाजारपेठेच्या दिवशी थाटलेल्या बाजारात नागरिकांना सोयीचे होत नसून त्या बाजारातून महिलांचे सोनसाखळी चोरी होणे, पिशवीतील हातचालाखीने पैसे चोरी होणे आदी घटना घडणे हे नित्याचे झाले आहे यासोबतच कामठी बस स्टँड चौक ते रेल्वे स्टेशन चौक तसेच ड्रॅगन पॅलेस भुयार पुलिया मार्गावर बिनधास्त पणे अतिक्रमन करुन दुकाने थाटले आहेत तसेच पासीपुरा पुरा मैदानाच्या कडेला सुद्धा नागरिकांनी अतिक्रमण करून मालकी हक्क गाजविला आहे या सर्व अतिक्रमनाला स्थानिक नगर परिषद प्रशासनाचा अभयपना दिसून येतो तेव्हा स्थानिक नगर परिषद प्रशासनाने पोलिस प्रशासन मदतीला घेऊन नागरिकांच्या समानवयातून अतिक्रमित दुकाणदारांना पर्यायी जागेची व्यवस्था करून देत स्मार्ट सिटी बनविण्याचा विचार अवलांबीत केला असल्याचे चर्चित आहे

  – कामठी शहराचा पुढील 20 वर्षाचा विचार करीत तयार करण्यात आलेल्या प्रारूप विकास आराखड्या नुसार निर्देशित केलेले पार्किंग नो पार्किंग झोन नुसार पोलीस क्वार्टर टी पॉईंट चौक ते शिवाजी पुतळा चौक , नगर परिषद जुना नका क्र 5 ते वारीसपुरा कडे जाणारा रस्ता, जी एन रोड ते शिव पंचायत मंदिर रस्ता, शहीद स्मारक चौक ते दमडू महाराज चौक, मोटर स्टँड चौक ते भाजीमंडी पूल, कोचर बंगला ते राममंदिर मोदी शाळेकडे जाणारा रस्ता,जे एन रोड प्रबुद्धनगर चर्च ते दरोगा मस्जिद कडे जाणारा रस्ता या सात मुख्य रस्त्यावर सकाळी 9 ते दुपारी 1 व दुपारी 3 ते सायंकाळी साडे सात पर्यंत जडवाहतुकीस प्रतिबंध राहणार आहे तसेच 8 ठिकाणी असलेल्या पार्किंग झोन नुसार मिनी ट्रक, कार इत्यादी वाहने उभी करण्यासाठी रुईगंज मैदान येथील खरेदी -विक्री सोसायटीला लागून असलेला परिसर , मोठ्या वाहनांसाठी जुना नाका क्र 1 जवळील परिसर, तसेच खुले नाट्यगृह , बैलबाजार व त्याबाजूची जागा, ऑटो स्टँड व छोटी वाहनासाठी पासीपुरा मैदान , ऑटोस्टॅण्ड करिता जुना नाका क्र 5 जवळील मोकळी जागा , दुचाकी वाहने व कारसाठी गांधीमंच समोरील जागा तसेच राजू चाटवाले यांच्या दुकानासमोरील जागा , ट्रक व कार तसेच इत्यादी वाहनासाठी आययुडीपी एरिया जागेतील शासकीय मोकळी जागा निश्चित करण्यात आली आहे तसेच 3ठिकानावरील नो पार्किंग साठी शहीद स्मारक ते दमडू चौक , मेंनरोड मोटर स्टँड चौक ते भाजीमंडी पूल , सरदार वल्लभभाई पटेल चौक ते डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या पर्यंत ची जागा निश्चिती करण्यात आलेली आहे.यासंदर्भात स्थानिक प्रशासनासह जनजागृती सह तशी सोय सुद्धा करण्यात आली आहे मात्र बेशिस्त वाहतूक दारांच्या वतिने नियमाला बगल देत असल्याने शहरातील पार्किंग व नो पार्किंग चा प्रश्न वाऱ्यावर असल्याचे दिसून येते ज्याकडे पोलीस विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

काटोल येथे नवीन वर्षात पहिला दस्त नोंदविणाऱ्या पक्षकारांचा सत्कार

Mon Jan 2 , 2023
काटोल प्रतिनिधि :-दुय्यम निबंधक काटोल कार्यालय येथे नवीन वर्षात पहिला दस्त नोंदविणाऱ्या निर्मला चोपडे व शुभांगी सालोडकर यांचा मा. तहसीलदार अजय चरडे व दुय्यम निबंधक सुधाकर निमजे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नोंदणी विभागातर्फे सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी रूपेश वाघ, शिवम सुर्यवंशी, मनिष बागडे, निलेश गोडबोले, राजु उमाठे अमोल तागडे व इतर अनेक पक्षकार कार्यालयात उपस्थित होते. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com