संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान :- विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वांगिण विकासात पालकांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे पालकांनी मुलांकडे विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन मुख्याध्यापक खिमेश बढिये यांनी केले.
धर्मराज प्राथमिक शाळा कांद्री-कन्हान येथे (दि.२१ ) ला पालकसभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धनंजय कापसिकर तर प्रमुख पाहुणे म्हणुन शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष विधिलाल डहारे, मुख्याध्यापक खिमेश बढिये, शाळा व्यवस्थापन समिती शिक्षक प्रतिनिधी भिमराव शिंदे, मेश्राम उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती देवीचे पूजन करुन सभेला सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी कापसिकर यांनी विद्यार्थ्यांना ओळखपत्र व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शाळा प्रशासनाने सहकार्य करावे असे आवाहन केले. तर मुख्याध्यापक खिमेश बढिये यांनी पालकांना विविध शिष्यवृत्तीची अस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्ती, सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती, ओबीसी शिष्यवृत्ती, भटक्या विमुक्त प्रवर्गाची शिष्यवृत्ती, एकल पालक शिष्यवृत्ती, दिव्यांग शिष्यवृत्ती माहिती देऊन सदर शिष्यवृत्ती प्रस्ताव १५ सप्टेंबर पर्यंत जमा करण्याचे आवाहन केले.यावेळी इयत्ता पहिलीच्या रोशन भोयर कांद्री, करुणा पाटील गोंडेगाव, दिनेश चिंचुलकर वराडा यांची पालक प्रतिनिधी म्हणुन निवड करण्यात आली. विद्या र्थ्यांचा शैक्षणिक विकास घडवुन आणण्यासाठी विद्या र्थ्यांचा गृहपाठ तपासावा, अभ्यासपुरक उपक्रमात सहकार्य करावे, नियमितपणे अभ्यासाची प्रगती जाणुन घ्यावी, शालेय प्रशासनाची शिस्त कायम ठेवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन मुख्याध्यापक खिमेश बढिये यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन व्यवस्थापन समितीचे शिक्षक प्रतिनिधी भिमराव शिंदेमेश्राम यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पूजा धांडे, कांचन बावनकुळे, सुनिता मनगटे, सुलोचना झाडे, नंदा मुद्देवार आदीनी सहकार्य केले.