नागपूर :- शेतक-यांना योग्य दाबाने वीज पुरवठा मिळावा यासाठी महावितरणच्या सावनेर विभागांतर्गत खापा येथील 33 केव्ही उपकेंद्रात 1.2 एमव्हीएआर क्षमतेचे नवीन स्वयंचलीत कॅपासिटर बँक व पॅनलची नवी उभारणी करून तीचे कार्यान्वयन अधीक्षक अभियंता (पायाभुत आराखडा) अजय खोब्रागडे यांच्या हस्ते बुधवारी (दि. 23 ऑगस्ट) रोजी करण्यात आले.
महावितरणचे नागपूर प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, नागपूर ग्रामिण मंडलाचे अधीक्षक अभियंता राजेश नाईक यांचा निरंतर पाठपुरावा व मार्गदर्शनात सावनेर विभागाच्या कार्यकारी अभियंता दिपाली माडेलवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कॅपासिटर बँक व पॅनलच्या कार्यान्वयन प्रसंगी अतिरिक्त कार्यकारी अभियंता मिलींद देशमुख (पायाभुत आराखडा), खापा उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता राजेश जयस्वाल, सहय्यक अभियंता अंजली गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. या कॅपासिटर बँक व पॅनलच्या कार्यान्वयनामुळे खापा उपकेन्द्रा अंतर्गत असलेल्या परिसरातील 19 गावांतील एकुण 902 शेतकऱ्यांना योग्य दाबाचा आणि गुणवत्तापुर्वक वीज पुरवठा उपलब्ध होणार असून नागपूर जिल्हयातील शेतक-यांसाठी महावितरणतर्फ़े अनेक योजना हाती घेण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
– उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,
प्रादेशिक कार्यालय, महावितरण, नागपूर