-हजारो शेतकरी लाभापासून वंचित
-अद्यावत माहिती अपलोड मध्ये बारा भानगडी
-तहसील कार्यालयातील बाबू फोन उचलत नाही
-वंचित शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी
काटोल :- किसान सन्मान योजनेचा सर्व देशभर गाजावाजा होत असताना मात्र काटोल तालुक्यातील हजारो शेतकरी लाभापासून वंचित असल्याचे चित्र समोर येत आहे. पी एम किसान ची साईड कित्तेक महिने बंद राहिल्याने हजारो शेतकरी पीएम किसानचे अर्ज अपलोड करू शकले नाही. ज्यांनी शेती विकली शेतीचे फेरफार झाले आपसी वाटण्या होऊन ज्यांच्या नावावर शेती सातबारा झाला अशा शेतकऱ्यांना प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधीचा फायदा झाला पाहिजे अशी तातडीचे व्यवस्था गावोगावी शिबिरे दर तीन महिन्याने घेऊन करावी अशी मागणी रिधोरा शेतकरी कृती समितीच्या वतीने करण्यात येत आहे. प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा फायदा घेण्यामध्ये काही अडचणी आल्यास तालुकास्तरावर विशेष माहिती करिता कोण कर्मचारी आहे त्याचा पत्ता कळेना अशी अवस्था तहसील कार्यालयाची झालेली असून वरिष्ठ अधिकारी यांनी संबंधित योजनेकरीता माहितीपर कर्मचारी फोन सुद्धा उचलत नाही. यावरून शेतकऱ्यांनी पी एम किसान सन्मान योजने करीता तहसील कार्यालयाच्या किती वेळा चकरा माराव्या असा प्रश्न समोर येत आहे. याकडे या भागाच्या लोकप्रतिनिधींनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे जेणेकरून प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ प्रत्येक शेतकऱ्याला सन्मानाने मिळाला पाहिजे नाहीतर रिधोरा शेतकरी कृती समितीच्या वतीने तहसील कार्यालयाच्या समोर शेतकऱ्यांचा विराट मोर्चा काढला जाईल अशी माहिती एका प्रसिद्धीपत्रकद्वारे रिधोरा कृती समितीचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी दिलेली आहे.