संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– कामठीत अवतरले शेगाव
कामठी :- आज 3 जानेवारीला संत गजानन महाराज सेवा समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या श्री संत गजानन महाराज पालखि यात्रेचे टिमकी चौक नागपूर येथून कामठी येथे पोहोचताच ठिकठिकाणी या पालखि यात्रेचे जँगी स्वागत करण्यात आले.ही पालखी यात्रा टिमकी चौक नागपूर येथिल श्री हरिहर गजानन निवसस्थानातून प्रस्थान होऊन रामटेक येथे समापन होणार आहे. ही पालखी यात्रा आज दुपारी 12 वाजता प्रथमता कामठी येथील रनाळा गावात पोहोचताच रणाळा ग्रा प चे सरपंच पंकज साबळे तसेच ग्रामवासियातर्फे भव्य आतिषबाजी करून यात्रेचे स्वागत करण्यात आले यावेळी स्वयंसेवकाकडून शोभयात्रेच्या मार्गाची साफसफाई करण्यात आली. यावेळी भक्तांनी फुलांचा वर्षाव करून शोभयात्रेचे तसेच पालखीत असलेले श्री संत गजानन महाराज यांच्याप्रतिमेचे आणि पादुकांचे ग्रामवासियायर्फे पूजन करण्यात आले तसेच फळांचे वितरण सुद्धा करण्यात आले.
ही पालखी यात्रा कामठी शहरात पोहोचताच गोयल टॉकीज चौक येथे भाजप कामठी शहराध्यक्ष चंद्रशेखर तूप्पट ,माजी नगरसेवक कपिल गायधने तसेच व्यापारी वर्ग च्या वतीने स्वागत करण्यात आले. तदनंतर शहराचे प्रमुख मार्गे भ्रमण करीत पालखी यात्रा ही प्राचिन्मय श्रीराम मंदिर येथे पोहोचली येथे पूजन आणि महाप्रसादाचे वितरण केल्यानंतर पालखी यात्रा कन्हानकडे रवाना झाली.