कोदामेंढी :- सध्या निवडणुकीच्या जोर संपूर्ण महाराष्ट्रसह जिल्हा जिल्ह्यात, तालुका तालुक्यात, गावा गावात सुरू असून कोदामेंढीतही नैसर्गिकरित्या वातावरण आज ढगाळ असले तरी राजकीय वातावरण मात्र उमेदवारांच्या प्रचाराने गावागावात काढत असलेल्या प्रभात फेऱ्याने, मुख्य रस्त्याच्या चौकालगत ,गावातील मुख्य ठिकाणी, वारडावारडात लावलेल्या उमेदवारांचे बॅनर, पोस्टर तसेच त्यांच्या प्रचारही सुरू असल्याने निवडणुकीचे वातावरण तापलेले आहे.
कोदामेंढी हे गाव कामठी विधानसभा क्षेत्र अंतर्गत येत असून येथे दहा उमेदवार रिंगणात आहेत. 10 पैकी आठ उमेदवार अपक्ष असून मुख्य लढत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरुद्ध काँग्रेसचे सुरेश भोयर यांच्यात होणार असून, दोघेही या विधानसभा क्षेत्रात यापूर्वी लढलेले असून दोघेही परिचित आहे, बावनकुळे हे याच विधानसभा क्षेत्रातून सतत दोनदा निवडून आलेले, कधीही निवडणूक न हरलेले व आमदारकीची हॅट्रिक करणारे उमेदवार असून भोयर हे मागच्याच 2019 च्या विधानसभेत भाजपचे आमदार टेकचंद सावरकर कडून पटकनी खाल्लेले उमेदवार असल्याचे चर्चा गावात सुरू आहे. दोघांचाही प्रचार जोमात सुरू असून अपक्ष उमेदवार असलेल्या एकही उमेदवाराच्या अजून बॅनर पोस्टर किंवा प्रचार या परिसरात पहायला ऐकायला मिळालेला नाही.
येथील भाजपचे कट्टर कार्यकर्ता असलेले रामचंद हटवार हे भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांचे पत्रक घरोघरी वाटून प्रचार करीत आहे, तर सुरेश भोयर यांनी येथे प्रचार कार्यालय उघडून यंदा लढत रंगतदार होण्याचे संकेत देत आहेत. तर गावात व परिसरातही बावनकुळे व भोयर यांचे पोस्टर फलक व प्रचाराच्या गाड्या फिरताना दिसत आहे, सध्या दोघांच्याही प्रचार जोमात सुरू असल्याने कोण पुढे व कोण मागे हे सध्या दोन-चार दिवस तरी सांगता येत नसल्याचे वार्ड क्रमांक एक चे जनाबाई पतसंस्थेचे मार्गदर्शक श्रावण तांबुलकर यांनी आज दिनांक 10 नोव्हेंबर रविवारला निवडणुकी संबंधित चर्चा करताना त्यांच्या घरासमोरील दुकानाजवळ सांगितले. भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे हे पुन्हा या विधानसभा क्षेत्रात निवडून येऊन या विधानसभेत निवडून येण्याची आमदारकीची हॅट्रिक करतात की काँग्रेसचे सुरेश भोयर भाजपच्या तगड्या उमेदवाराला धोबीपछाड देऊन खाता खोलतात हे येणाऱ्या 23 नोव्हेंबरला निवडणुकीच्या निकाला च्या दिवशी कळणार आहे.