राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) देशभरातील सर्व बांधकामाधीन बोगद्यांचे सुरक्षा लेखा परीक्षण करणार

– देशभरातली बोगद्यांचे बांधकाम मजबूत करण्यासाठी एनएचएआय ने कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड बरोबर केला सामंजस्य करार

नवी दिल्ली :- महामार्गांवरील बोगद्यांच्या बांधकामा दरम्यानची सुरक्षा आणि उच्च दर्जाच्या मानकांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) देशभरातील सर्व 29 बांधकामाधीन बोगद्यांचे सेफ्टी ऑडिट, अर्थात सुरक्षा लेखा परीक्षण करणार आहे.

एनएचएआय चे अधिकारी, दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (DMRC) तज्ञांचे पथक तसेच इतर बोगदा तज्ञांसह बांधकाम सुरु असलेल्या बोगदा प्रकल्पांची पाहणी करतील आणि सात दिवसांच्या आत आपला अहवाल सादर करतील. देशभरात विविध ठिकाणी एकूण सुमारे 79 किमी लांबीच्या 29 बोगद्यांचे बांधकाम सुरु आहे. यामध्ये हिमाचल प्रदेशातील 12 बोगदे, जम्मू-काश्मीरमधील 06, महाराष्ट्र, ओदिशा, राजस्थानमधील प्रत्येकी 02 आणि मध्य प्रदेश, कर्नाटक, छत्तीसगड, उत्तराखंड आणि दिल्ली या राज्यांमधील प्रत्येकी एक बोगदा समाविष्ट आहे.

‘एनएचएआय’ ने कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (केआरसीएल) बरोबरच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरीही केली आहे. या कराराअंतर्गत, केआरसीएल एनएचएआयच्या प्रकल्पांना बोगद्याचे बांधकाम आणि उतार स्थिरीकरणाशी संबंधित आराखडा, रेखाचित्र आणि सुरक्षितते बाबतच्या पैलूंचे पुनरावलोकन करण्यासाठी सेवा प्रदान करेल. केआरसीएल बोगद्यांचे सेफ्टी ऑडिट देखील करेल आणि आवश्यकता असेल तर, उपाय सुचवेल. या व्यतिरिक्त, केआरसीएल, एनएचएआय च्या अधिकाऱ्यांच्या क्षमता विकासाकरता प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करेल. हा करार दोन वर्षांच्या कालावधीसाठी लागू राहील.

यापूर्वी सप्टेंबर 2023 मध्ये, एनएचएआय ने डीएमआरसी बरोबर असाच करार केला होता. या अंतर्गत, डीएमआरसी देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवरील बोगदे, पूल आणि इतर संरचनांचे नियोजन, आराखडा, बांधकाम आणि देखभाल यासाठी सेवा प्रदान करेल.

हा उपक्रम सुरक्षित आणि अखंड राष्ट्रीय महामार्ग नेटवर्क तयार करण्याचा, आणि वाहतूक पायाभूत सुविधांच्या वाढीसाठी सर्वोत्तम पद्धतींची देवाण घेवाण करण्यासाठी सरकारी संस्थांशी सहयोग करण्याचा, एनएचएआय चा संकल्प अधोरेखित करतो. ज्यायोगे राष्ट्रउभारणीच्या कामाला हातभार लागेल.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बँकॉक येथे सुरु असलेल्या दिव्यांगांसाठीच्या आशियाई तिरंदाजी स्पर्धेत केलेल्या नेत्रदीपक कामगिरीबद्दल पंतप्रधानांनी भारतीय दिव्यांग तिरंदाज संघाचे केले अभिनंदन

Thu Nov 23 , 2023
नवी दिल्ली :- बँकॉक येथे सुरु असलेल्या दिव्यांगांसाठीच्या आशियाई तिरंदाजी स्पर्धेत केलेल्या नेत्रदीपक कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय दिव्यांग तिरंदाज संघाचे अभिनंदन केले आहे. एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणतात;https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-14.56.12_caaf8c51.mp4 “बँकॉक येथे सुरु असलेल्या दिव्यांगांसाठीच्या आशियाई तिरंदाजी स्पर्धेत मिळवलेला ऐतिहासिक विजय!https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-16.38.56_131274e2.mp4 नेत्रदीपक कामगिरी करून इतिहासाच्या पानांवर स्वतःचे नाव कोरल्याबद्दल भारतीय दिव्यांग तिरंदाज संघातील लोकोत्तर खेळाडूंचे अभिनंदन!https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-16.46.31_6d1c5419.mp4 4 सुवर्णपदकांसह एकूण […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com