संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– तहसिलदार पारशिवनी याना निवेदनाने शेतक-याची मागणी.
कन्हान :- डुमरी (कला) येथील शेतक-यांच्या शेतातील धान पिकाचे अवकाळी पाऊसाने मोठया प्रमाणे नुकसान झाले. तेव्हा निवडक शेतक-यांचे नुकसान भरपाई यादीत नावे असुन बहुतेक शेतक-यांचे नावे नसल्याने मौका चौकसी करून शेतक-यांचे नावे समाविष्ट करून नुकसान भरपाई मिळवुन देण्याची मागणी तहसिलदार पारशिवनी हयाना करण्यात आली.
मौजा डुमरी (कला) पटवारी ह. न.१८ अ येथिल शेतक-यांनी सत्र २०२३-२४ मध्ये धान पिकाची लागवड केली होती. त्यावेळी झालेल्या अवकाळी पावसा मुळे शेतातील संपूर्ण धान पिकाचे नुकसान झाल्याने ग्राम पंचायत डुमरी (कला) येथे नुकसान ग्रस्त शेतक-याचा सात बारा, आठ अ, आधार कार्ड, बँक खाते आदी कागद पत्राची झेराक्स जमा करण्यात आली. परंतु धान पिक नुकसान भरपाई यादीत गावातील निवडक शेतक-यांचे नाव नोंद आहे. उर्वरित शेतक-यां चे नावे नसल्याने नुकसान ग्रस्त शेतकरी वंचित राहु नये यास्तव नुकसान ग्रस्त शेतक-यांची मौका चौकसी करून अवकाळी पावसाने नुकसान ग्रस्त शेतक-यांना शासना कडुन नुकसान भरपाई मिळवुन द्यावी अश्या मागणीचे निवेदन मा. तहसिलदार पारशिवनी हयाना सभापती पारशिवनी सौ मंगलाताई निंबोणे, सिताराम पटेल भारव्दाज यांच्या नेतुत्वात नुकसान ग्रस्त शेतक री सुभाष पांडे, नीरज डेगे, प्रफुल पांडे, मारोती बुराडे, मधुकर डेगे, दुमदेव भरती, सेवकराम डेगे, बंडु चौधरी, शंकर देवढगले, हरीश खेरगडे, आशिष सिल्हार,नितीन बुराडे, विनोद घोडाकाडे, किशोर देवढगले, श्रीकांत डेगे, श्रावण पांडे आदी शेतक-यांनी मागणी केली आहे.