संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- मतदार नोंदणी ही शासनाची वर्षभर निरंतर चालणारी कार्यालयीन प्रक्रिया असताना याच मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात चुका असल्याचे लक्षात येत आहे. नुकतेच कामठी तालुक्यातील 27 ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या असून नगर परिषद निवडणुका लागण्याच्या तोंडावर आहेत मात्र मतदार यादीत कित्येक मयतांची नावे अजूनही तसेच कायम आहेत तेव्हा या मयत मतदारांची नावे मतदार यादीतून कमी करण्यात यावे अशी मागणी रिपाई(गवई)चे नागपूर प्रदेश उपाध्यक्ष प्रा. प्रमोद चहांदे यांनी केले आहे.
महसूल विभागात निवडणूक हा एक स्वतंत्र विभाग आहे.यासाठी विशेष नाव व तहसीलदारांची नियुक्ती शासनाने करून ठेवली आहे.याच निवडणूक विभागामार्फत मतदारांची नावे कमी करणे व नवीन नावे मतदार यादीत समाविष्ट करणे हे काम वर्षभर चालते.याच मतदार याद्या अद्यावत करण्यासाठी अनेकदा शिबीर सुद्धा घेतल्या जातात. मोठा गाजावाजा करून सप्ताह व पंधरवाडा साजरा केल्या जातो. तहसील कार्यालयात मतदार नोंदणी साठी व नावे कमी करण्यासाठी विशेष कर्मचारी आहेत असे असताना याच मतदार यादीमध्ये मयत ची नावे अजूनही कायम आहेत तेव्हा अशा मयत मतदारांची नावे मतदार यादीतून नावे कमी करण्यात यावे अशी मागणी रिपाई नागपूर प्रदेश उपाध्यक्ष प्रा. प्रमोद चहांदे यांनी केले आहे.