मनपा आयुक्तांनी केली जलपर्णी काढणाऱ्या ‘जलदोस्त’ ची पाहणी

– मनापाद्वारे अंबाझरी तलावातून जलपर्णी काढण्याच्या कार्याला वेग 

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या वतीने शहर स्वच्छतेसाठी सतत कार्य केले जाते. मनपाच्या धरमपेठ झोन अंतर्गत येणाऱ्या प्रसिद्ध अंबाझरी तलावात जलपर्णी तयार झाली असून त्याच्या स्वच्छतेसाठी मनपाकडून अंबाझरी तलाव येथे गुरुवार (ता.७) रोजी नॅशनल एरोस्पेस लेबारेटरी व नीरी संस्थेच्या माध्यमातून तयार केलेल्या ‘जलदोस्त’ या मशीन बोटीच्या सहाय्याने जलपर्णी काढण्याचा प्रयोग करण्यात आला. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सीएसआयआर- नीरीचे निर्देशक डॉ अतुल वैद्य यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्याचे निरीक्षण केले.

याप्रसंगी मनपाच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, सीएसआयआर- एनएएलचे डॉ कार्तिकेयन, मनपाचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे, अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक डॉ. गजेंद्र महल्ले, कार्यकारी अभियंता रविंद्र बूंधाडे, कार्यकारी अभियंता उज्वल लांजेवार, निरीचे डॉ अत्या कपले,डॉ महेंद्र पाटील, संगीता गोयल, शारदा कुसनकर, डॉ अंशुमन खर्डेनवीस, मनपाचे संदीप लोखंडे, चंद्रकांत गभणे, तसेच ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे कौस्तव चॅटर्जी, सुरभी जयस्वाल, मेहुल कोसुरकर, बिष्णुदेव यादव, प्रिया यादव, श्रीया जोगे, काजल पिल्ले आदी उपस्थित होते.

“जलपर्णीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मनपा सतत कार्य करत आहे. नागपूर महानगरपालिकेतर्फे वेगवेगळ्या पद्धतीने जलपर्णी काढण्यासाठी प्रयत्न केले जाते. नॅशनल एरोस्पेस लेबारेटरी सहाय्याने तयार करण्यात आलेल्या फ्लोटिंग मशीनला (‘जलदोस्त’) जलपर्णी काढण्यासाठी तपासून पाहिले गेले. प्राथमिक दृष्ट्या पहिले असता लक्षात आले की, ती मशीन प्रयोग तत्वावर वापरू शकतो. त्यात पुढील काळात गरज असल्यास सुधारणा देखील करू, “असे मनपाचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी म्हटले.

‘जलदोस्त’ तयार करणारे सीएसआयआर- एनएएलचे डॉ कार्तिकेयन यांनी म्हटले कि, या मशीन बोटीच्या सहाय्याने सर्व तलावातील जलपर्णी काढण्याचे कार्य करता येईल. हि मशीन बंगलोर येथून आणली गेली आहे. हि मशीन वापरण्याची सुरुवात नागपूरच्या अंबाझरी तलावापासून करत आहोत. नंतर या माशिनीचा वापर आम्ही भारतभर करू. भारतातील सर्व तलाव स्वच्छ राहावे हे आमचे ध्येय आहे. हि मशीन एअरक्राफ्ट तंत्रज्ञानावर आणि हायब्रीड मरीन तंत्रज्ञानावर चालते. तलावात ज्या ठिकाणी मानवी सहय्याने जलपर्णी काढणे अशक्य आहे तेथे देखील हि मशीन कार्य करते. ५ ते ६ लोक जितकी जलपर्णी काढू शकतात त्यांचे कार्य हि एकटीच मशीन करू शकते असेही त्यांनी सांगितले.

या मशिनीच्या सहाय्याने जास्तीत जास्त जलपर्णी काढून तलावाचे संवर्धन करू असे निरीचे निर्देशक डॉ. अतुल वैद्य यांनी म्हटले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आद्य क्रांतीकारक राजे उमाजी नाईक यांचे जयंती निमित्त म.न.पा. तर्फे विनम्र अभिवादन

Fri Sep 8 , 2023
नागपूर :- भारताच्या सशस्त्र क्रांतीचे जनक, थोर आद्य क्रांतीकारक राजे उमाजी नाईक यांच्या जयंती निमित्त म.न.पा. केंद्रीय कार्यालयात क्रांतीकारक राजे उमाजी नाईक यांचे प्रतिमेला माल्यापर्ण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी अति. आयुक्त निर्भय जैन, मुख्य अभियंता राजीव गायकवाड, उपायुक्त सुरेश बगळे, उपायुक्त रविंद्र भेलावे, माहिती व तंत्रज्ञान संचालक महेश धामेचा, अमोल तपासे, मुकेश मोरे, राजेश लोहितकर, कैलास लांडे, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com