संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
-विद्दूत रोषणाईने घरे सजवायला सुरुवात, बाजारपेठेत उत्साह
कामठी :- दिवाळी सण अवघ्या तोंडावर असून दिवाळी सणाच्या स्वागतासाठी कामठी तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण भागातील बाजारपेठ सजली असून बाजारामध्ये आकाश कंदील,पणत्या व विजेवरील तोरणे यांचा झगमगाट दिसुन येत आहे.
यावर्षी दिवाळी सण मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा होणार असल्याचे एकंदर वातावरण दिसुन येत आहे.दिवाळी म्हटली की प्रत्येक घरात आनंदाचे उत्साहाचे वातावरण असते .कितीही महागाई असली तरी काटकसर करून का होईना आपल्याला जमेल तसे सण साजरा केला जाणार असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे या दिवाळीच्या निमित्ताने सर्वत्र तयारी सुरू आहे.दिवाळीच्या निमित्ताने अनेकजण घरामध्ये करंजा, लाडू, चकली,चिवडा अश्या प्रकारचे वगवेगळे फराळाचे गोड पदार्थ बनवत असल्याचे दिसून येत आहे.मागील दोन वर्षी कोरोनाचा जास्त प्रभाव असल्याने दिवाळी साजरी करताना काही मर्यादा आल्या होत्या यावर्षी हा प्रभाव नसल्याने दिवाळीची तयारी जय्यत सुरू झाली आहे.