अरोली :- येथून जवळच असणाऱ्या गट ग्रामपंचायत बोरी-घिवारी अंतर्गत येणाऱ्या वाघबोडी येथे उद्या 24 जानेवारी शुक्रवारला मंडई उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मंडई उत्सवापूर्वी 23 जानेवारी गुरुवारला गावातीलच सार्वजनिक हनुमान मंदिरात गोपालकाला व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. 24 जानेवारी शुक्रवारला सकाळी दहा वाजता पासून ते रात्री दहा वाजेपर्यंत तरुण नवयुवक उत्साही मंडळ व समस्त ग्रामवासी वाघबोडी तर्फे नवयुवक कलंगी मंडळ वाघबोडी येथील शाहीर प्रमोद चामलाटे विरुद्ध निळा निशान मंडळ जि. चंद्रपूर, ता. नागभिड अंतर्गत येणाऱ्या कांपा येथील शाहीर सुरमा बारसागडे यांच्या जंगी दुय्यम खडा तमाशा चे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाला गावातील, परिसरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी ,पुढारी व मान्यवर उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाच्या लाभ घेण्याचे आव्हान तरुण नवयुवक उत्साही मंडळ चे आयोजक सह दिनेश देवतारे ,डुलीचंद कारूंडे, दिनेश पटले, दिलीप मोहने, गणेश शेंद्रे ,हरपाल पटले सह समस्त ग्रामवासी यांनी केले आहे व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व सहकार्य करत असून परिश्रम घेताना दिसत आहेत.