– स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीणची कारवाई
नागपूर :- सुधीर रज्जू इंगळे याचे कुटुंबातील सदस्यावर पोलिसांकडे मुखबिरी करित असल्याचा आरोप करून व त्या संबंधाने फिर्यादीच्या पत्नीने दादा तेलंगे, बुध्द तेलंगे विरुद्ध दिलेल्या रिपोर्टच्या बदला घेण्यासाठी यातील आरोपी क्र. १) दादा तेलगे, २) बुद्ध तेलंगे, त्यांच्यासोबत आरोपी क्र. ३) रितिक दुपारी ४) गणेश सहारे, ५) रुपेश फाटा, तसेच दादा तेलंगे यांचे जरीपटका येथील नातेवाईक आरोपी क्र. ६) अरुण आवळे, ७) दर्शन बोरकर, ८) राहुल अन्नेवार व इतर असे यांना चार मोटरसायकलवर घेऊन फिर्यादी व फिर्यादीच्या परिवारातील लोकांना जिवे मारण्याच्या उद्देशाने हातात बंदूक, तलवार, लाठया, शॉकअप घेऊन आले तलवारी लाठयांनी फिर्यादीचे घरातील लोकांना विटा मारून जखमी केले व फिर्यादीची मामे बहीण स्नेहा हिचेवर बंदुकीने फायर करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. अशा फिर्यादीच्या तोंडी रिपोर्ट वरून पोस्टे खापरखेडा येथे अप क्र. अप.क्र. ५४४ / २०२३ कलम १४७, १४८, १४९, ३०७, ३३६, ३३७, ४२७, ५०६ भादंवी सहकलम ३/२५ ४/२५ आर्म अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत असतांना दिनांक १५/०९/२०२३ रोजी पथकास गोपनीय माहिती मिळाली की. सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी नामे १) देवधन उर्फ बुद्ध रज्जूराव तेलंगे, वय ३० वर्ष, रा. वार्ड क्र. ४ इंदिरानगर खापरखेडा, ता. सावनेर, जि. नागपूर २) रितिक सुरेश दुपारे वय २२ वर्ष, रा. वार्ड क्र. ४ इंदिरानगर खापरखेडा, ता. सावनेर, जि. नागपूर हे घटनेनंतर काटोल परीसरात दिसुन आले आहे. अशा मिळालेल्या माहिती वरून सदरची माहिती लागलीच वरिष्ठांना देवून, स्टाफसह मिळालेल्या माहिती प्रमाणे गेले असता सदर आरोपी हे परसोडी शिवार काटोल येथे जातांना दिसून आल्याने त्यांचा पाठलाग करून त्यास अत्यंत शिताफीने त्यांना ताब्यात घेवुन पुढील कायदेशीर कारवाई करिता पो.स्टे. खापरखेडा यांच्या ताब्यात देण्यात आले.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर (ग्रामीण) हर्ष ए. पोदार (भा.पो.से.) तसेच अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांचे मार्गदर्शनात गुन्हे शाखेने पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सहायक पोलीस निरीक्षक राजीव कर्मलवार, पोलीस उपनिरीक्षक आशिष मोरखडे, पोलीस हवालदार विनोद काळे, इक्बाल शेख, राजेंद्र रेवतकर, आशिष मुंगळे, पोलीस नायक वीरेंद्र नरड, संजय भरोदिया, राकेश तालेवार, निलेश इंगुलकर, किशोर वानखेडे, सतीश राठोड चालक पोलीस हवालदार अमोल कुथे, आशुतोष लांजेवार, मुकेश शुक्ला यांनी पार पाडली.